Advertisement

प्रसिद्ध 'गेट वे ऑफ इंडिया' परिसरचं मोठं नुकसान

मुंबईतील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या गेट वे ऑफ इंडिया परिसराचे ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे नुकसान झाले आहे.

प्रसिद्ध 'गेट वे ऑफ इंडिया' परिसरचं मोठं नुकसान
SHARES

मुंबईतील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या गेट वे ऑफ इंडिया परिसराचे ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे नुकसान झाले आहे. गेट वे ऑफ इंडिया लगत समुद्राला तटबंदी रूपात उभारलेल्या धक्क्यांचे भलेमोठ्ठे दगड लाटांच्या माऱ्याने निखळले आणि दूर जाऊन पडले. तर गेट वे ऑफ इंडियाभोवती सुशोभीकरणासाठी उभारलेल्या कठडय़ाचा काही भागही पडला. देश-विदेशातील पर्यटकांसाठी समुद्रकिनाऱ्यालगत उभे असलेले गेट वे ऑफ इंडिया आकर्षणस्थान बनले आहे.

सोमवारी तौक्ते चक्रीवादळामुळं समुद्र खवळला असून,  समुद्राच्या लाटांनीही रौद्ररूप धारण केलं होतं. उसळणाऱ्या लाटांचा मारा सतत गेट वे ऑफ इंडिया परिसरात होत होता. लाटांच्या तडाख्यामुळं गेट वे ऑफ इंडिया आणि समुद्रादरम्यान उभ्या केलेल्या तटबंदीचे २ प्रचंड मोठे दगड निखळून दूर फेकले गेले. त्याचबरोबर गेट वे ऑफ इंडियाच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी भोवती उभारलेल्या कठड्याच्या काही भागाचं लाटांच्या माऱ्यामुळं नुकसान झालं. लाटांसोबत आलेला कचरा गेट वे ऑफ इंडिया परिसरात पसरला होता. मुंबई महापालिकेच्या ‘ए’ विभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांनी मंगळवारी या परिसराची पाहणी केली, तसेच लाटांसोबत आलेला कचराही उचलण्यात आला. महापौर किशोरी पेडणेकर यांनीही गेट वे ऑफ इंडियाची पाहणी केली.

पुरातन वारसा वास्तूचा दर्जा लाभलेल्या गेट वे ऑफ इंडियालगतच्या परिसराचे चक्रीवादळामुळे नुकसान झाले असून त्याची पाहणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. करोनामुळे सध्या केवळ १५ टक्के कर्मचारी कार्यालयात उपस्थित असतात. त्यामुळे पुढील आठवडय़ात गेट वे ऑफ इंडिया परिसराची पाहणी करण्यात येईल. त्यानंतर दुरुस्ती करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

पाचवा जॉर्ज आणि राणी मेरी यांनी १९११ मध्ये भारताला भेट दिली होती. या भेटीचे स्मारक म्हणून भव्य कमान उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या कमानीची पायाभरणी ३१ मार्च १९१३ रोजी करण्यात आली आणि १९२४ मध्ये ही वास्तू उभी राहिली. या वास्तूची रचना इंडो-सारासेनिक शैलीत करण्यात आली. या वास्तूची  उंची २६ मीटर (८५ फूट) इतकी आहे. अपोलो बंदर येथे उभारलेली ही वास्तू गेट वे ऑफ इंडिया या नावाने ओळखली जाऊ लागली. 



हेही वाचा - 

मुंबईच्या पालकमंत्र्यांनी केली नुकसानग्रस्त किनारपट्टीची पाहणी

चक्रीवादळानंतरही मुंबईत पावसाच्या हलक्या सरी

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा