Advertisement

टॅक्सीत शिवस्मारक!

मुंबईतील एका टॅक्सी चालकानं आपल्या टॅक्सीमध्येच छत्रपती शिवाजी महाराजांची स्थापना केली असून, किल्ला साकारला आहे

SHARES

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड-किल्ल्यांची प्रतीकृती आजपर्यंत आपण मोठ-मोठ्या कार्यक्रमांमध्ये पाहिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या यांच्या प्रत्येक गड-किल्ल्यांना इतिहास असल्यानं आवर्जून यांचे देखावे सादर केले जातात. मात्र, मुंबईतील एका टॅक्सी चालकानं आपल्या टॅक्सीमध्येच छत्रपती शिवाजी महाराजांची स्थापना केली असून, किल्ला साकारला आहे. 

साईप्रसाद नायक असं या टॅक्सी चालकाचं नाव आहे. साईप्रसाद हा दादर ते सिद्धिविनायक या मार्गावर आपली टॅक्सी चालवतो. साईप्रसाद यानं आपल्या टॅक्सीच्या डिक्कीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ली व महाराजांच्या मूर्तीची स्थापना केली आहे. साईप्रसाद ही कल्पना प्रवाशांना आकर्षित करते. काही प्रवाशांनी त्याच्या टॅक्सीमधून प्रवास केल्यानंतर 'आपल्या मागे छत्रपती शिवरायांचा हात आहे', अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर काही प्रवाशांनी त्याच्या या कल्पनेचं मोठं कौतुकही केलं.


टॅक्सीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती सादर करण्याची कल्पना श्रीकांत वेमुला यानं दिल्याचं साईप्रसाद यानं सांगितलं. श्रीकांत वेमुला हे आर्टीट्स असून त्यांन अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात डोकोरेशन साकारले आहेत. तसंच, साईप्रसाद याच्या टॅक्सीमध्येही त्यांनीच किल्ली साकारला आहे. हा किल्ला साकरण्यासाठी इकोफ्रेंडीली वस्तूंचा वापर केल्याचं श्रीकांत वेमुला यांनी सांगितलं.

साईप्रसाद यांनी आपल्या टॅक्सीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला साकरला असून, तोफा, घोडा, ढाल, तलवार देखावासाठी ठेवल्या आहेत.हेही वाचा -

'एसी'साठी प्रवासी वाढवण्याचं मध्य रेल्वेसमोर मोठं आव्हान

मेट्रोकडून दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी 'ही' अनोखी सुविधासंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा