Advertisement

वाढत्या उष्म्यामुळे मुलांमध्ये तापाचं प्रमाण अधिक

मुंबईसह आसपासच्या परिसरात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात उष्णता वाढत आहे.

वाढत्या उष्म्यामुळे मुलांमध्ये तापाचं प्रमाण अधिक
SHARES

मुंबईसह आसपासच्या परिसरात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात उष्णता वाढत आहे. शिवाय हवेतील वाढलेली आर्द्रता आणि उष्म्यामुळे आरोग्याच्या विविध प्रकारच्या तक्रारी निर्माण झाल्या आहेत. त्यात ताप येण्यापासून डोळे लाल होणे, ओठामध्ये फोड येणे, अंगावर पुरळ उठणे, पाठीवर चट्टे येणे, पोटात मुरडा पडणे, अतिसाराचा त्रास होण्याच्या तक्रारी घेऊन वैद्यकीय तज्ज्ञांकडे येणाऱ्यांचे प्रमाण वाढते आहे. यात मुलांना ताप येण्याचे प्रमाणही वाढले आहे.

लहान मुलांना होणारा विविध प्रकारचा त्रास अधिक असल्याचे दिसून येते. लहान मुलांमध्ये व्हायरल संसर्गाचे प्रमाण वाढताना दिसते. ऑक्सिजनची पातळी व्यवस्थित असते, मात्र २ ते ३ दिवस सतत ताप अंगात राहतो. त्यामुळे योग्यवेळी वैद्यकीय उपचार सुरू करणे गरजेचे आहे.

काही रुग्णांमध्ये कोरोनाच्या चाचण्या निगेटिव्ह येतात, टायफॉईडचे निदान होते. मात्र पुढील काही दिवसांनी पुन्हा ताप यायला सुरूवात होते. त्यावेळी कोरोना संसर्गासाठी चाचण्या केल्या तर त्या पॉझिटिव्ह असलेल्या दिसतात. त्यामुळे तापांच्या लक्षणांकडे अधिक काळजीपूर्वक पाहायला हवे. जे डॉक्टर वैद्यकीय उपचार देत आहेत त्यांच्याशी सातत्याने संवाद ठेवायला हवा. कोणत्याही प्रकारे शारीरिक लक्षणांमध्ये बदल जाणवला तर त्याची माहिती डॉक्टरांना द्यायला हवी.हेही वाचा -

"रावरंभा" तून उलगडणार ऐतिहासिक प्रेमकहाणी..

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा