Advertisement

मुंबईच्या तापमानात वाढ; उकाड्यानं मुंबईकर हैराण

मुंबईत यंदा मे महिन्यात तौक्ते चक्रीवादळामुळे अवकाळी पावसामुळं पावसानं हजेरी लावली. मात्र, या अवकाळी पावसानंतर मुंबईसह राज्यभरात प्रचंड उकडा वाढला आहे.

मुंबईच्या तापमानात वाढ; उकाड्यानं मुंबईकर हैराण
SHARES

मुंबईत यंदा मे महिन्यात तौक्ते चक्रीवादळामुळे अवकाळी पावसामुळं पावसानं हजेरी लावली. मात्र, या अवकाळी पावसानंतर मुंबईसह राज्यभरात प्रचंड उकडा वाढला आहे. मुंबईकरांना घामाच्या धारांचा त्रास सहन करावा लागत असून, आता मान्सून आगमनाची चाहूल लागल्याने आर्द्रतेमध्येही वाढ झाली आहे. यामुळे प्रत्यक्षातील तापमानापेक्षा अधिक उकाडा जाणवत असून मुंबईकरांची अस्वस्थता वाढली आहे.

चक्रीवादळाचे पडसाद कमी झाल्यावर शुक्रवारपासून मुंबईचे किमान तापमान पुन्हा एकदा वाढायला सुरुवात झाली आहे. किमान तापमानाचा पारा शनिवार, रविवार आणि सोमवार या तिन्ही दिवशी कुलाबा आणि सांताक्रूझ येथे २७ अंशांच्या पुढे आहे. सोमवारी सांताक्रूझ इथं २७.६ तर कुलाबा येथे २७.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. मुंबईमध्ये गेल्या १० वर्षांमध्ये मे अखेरीस किमान तापमानाचा पारा २९ अंशांपर्यंतही पोहोचला आहे. त्यामुळे या किमान तापमानात आणखी वाढही होऊ शकते. ढगाळलेले आभाळ, सकाळच्या वेळी वाढलेली आर्द्रता आणि वाढलेले किमान तापमान यामुळे उष्णतेच्या अधिक झळा मुंबईकरांना जाणवत आहेत.

येत्या ४ दिवसांमध्ये मुंबईच्या किमान तापमानाचा पारा २७ अंशांच्या आसपास असण्याचा अंदाज आहे. मुंबईत सोमवारी कुलाबा इथं सोमारी ३३.४ तर सांताक्रूझ इथं ३३.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. गेले २ कमाल तापमानाचा पाराही सरासरीच्या आसपास आहे. तरीही अधिक उकाडा जाणवत आहे. या वाढत्या उकाड्याच्या जाणीवेमुळे पावसाचा दिलासा लवकर मिळू असाच विचार दरवर्षीप्रमाणे मुंबईकरांच्या मनात येऊ लागला आहे.

मुंबई आणि कोकण विभाग वगळता उर्वरित महाराष्ट्रामध्ये सध्या तापमानामध्ये सरासरीपेक्षा फार वाढ नाही. मात्र येत्या ३ ते ४ दिवसांमध्ये राज्याच्या अंतर्भागामध्ये २ ते ४ अंशांची वाढ अपेक्षित असल्याचे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. कोकणात तसेच मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आज, मंगळवारी तुरळक पाऊस अपेक्षित आहे. यामुळे तापमानात किचिंत फरक जाणवण्याची शक्यता आहे.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर येथे मंगळवारी मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. तर बुधवारपासून हलक्या पावसाच्या सरींची शक्यता आहे. मुंबईमध्ये मात्र कोरडे वातावरण असेल. त्यामुळे मुंबईकरांना पावसामुळे तापमानात दिलासा मिळण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागेल असा अंदाज आहे. मराठवाड्यामध्ये गुरुवार-शुक्रवारच्या आसपास मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी सरींची शक्यता आहे.

अंदमानमध्ये दाखल झाल्यापासून मान्सूनने श्रीलंकेपर्यंतचा प्रवास जलद केला. त्यानंतर तो पुढे सरकलेला नाही. या पार्श्वभूमीवर सध्या मान्सूनची आणि त्यामुळे उकाड्यातून सुटकेची प्रतीक्षा कायम आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा