Advertisement

ठाणेकरांनो लक्ष द्या! 2-3 नोव्हेंबरला 'या' भागातील पाणीपुरवठा बंद

दुरुस्ती व देखभालीचे काम सुरू असल्याने गुरुवारी पाणीपुरवठा विस्कळीत राहणार आहे.

ठाणेकरांनो लक्ष द्या! 2-3 नोव्हेंबरला 'या' भागातील पाणीपुरवठा बंद
SHARES

ठाणे महापालिका क्षेत्रातील मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा मानपाडा आणि वागळे (काही भाग) प्रभाग समित्यांमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणीपुरवठा केला जातो. पण या भागांचा पाणीपुरवठा खंडीत केला जाणार आहे. 

जांभूळ येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बारवी जलशुद्धीकरण केंद्रात तातडीने दुरुस्ती व देखभालीचे काम सुरू असल्याने गुरुवारी पाणीपुरवठा खंडीत करण्यात येत आहे.

3 नोव्हेंबर रोजी दुपारी 12:00 ते शुक्रवार, 4 नोव्हेंबर रोजी रात्री 12:00 वाजेपर्यंत 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

सदर बंद कालावधीत ठाणे महानगरपालिकेच्या अखत्यारीतील सर्व भागात दिवा, मुंद्रा (प्रभाग क्र. 26 आणि 31 चा भाग वगळून) आणि कळवा प्रभाग समिती आणि वागळे प्रभाग समितीमधील रूपादेवी पाडा, किसननगर क्रमांक 2, नेहरूनगर आणि कोलशेत खालचा गाव अंतर्गत मानपाडा प्रभाग समिती इथे २४ तास पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.

पाणीपुरवठा पुन्हा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, याची नागरिकांनी कृपया नोंद घ्यावी.

या पाणीकपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरून सहकार्य करण्याचे आवाहन ठाणे महापालिकेच्या वतीने नागरिकांना करण्यात येत आहे.



हेही वाचा

Mumbai Local News: मध्य रेल्वेवर 10 अतिरिक्त AC ट्रेन 6 नोव्हेंबरपासून धावणार

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा