ठाणे शहरातील कोपरी भागात बुधवारी गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला होता. काही काळासाठी गॅस पुरवठा खंडित झाल्याची तक्रार अनेकांनी केली. पाईपलाईन खराब झाल्यानं ग्राहकांना या समस्येचा सामना करावा लागला. ठाणे जनता सहकारी बँकेजवळ सकाळी ही घटना घडली.
प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षानं (आरडीएमसी) म्हटलं आहे की, उड्डाणपुलाच्या कामासाठी तैनात केलेल्या उत्खनन यंत्रणेचे नुकसान झाल्यानं महानगर गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला. अधिकाऱ्यानं परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सांगितलं.
आरडीएमसीने सांगितलं की, "१००-१५० ग्राहकांची गॅस सेवा खंडित करण्यात आली आहे आणि काम पूर्ण झाल्यानंतर एका तासामध्ये पुरवठा पुन्हा सुरू केला जाईल."
घटनेनंतर महानगर गॅसचे अधिकारी, आरडीएमसी आणि अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. यात कोणीही जखमी झालं नाही. दरम्यान, आणखी एका घटनेत वर्सोवामध्ये सिलेंडर स्फोटामध्ये ४ जण जखमी झाले.
हेही वाचा