Advertisement

ठाण्यातील जांबळी नाका भाजी मंडई १५ एप्रिलपासून बंद

जांबळी नाका भाजी मंडई १५ एप्रिलपासून बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ठाण्यातील जांबळी नाका भाजी मंडई १५ एप्रिलपासून बंद
SHARES

जांबळी नाका भाजी मंडई १५ एप्रिलपासून बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे शहरातील विविध भागातील किरकोळ विक्रेत्यांना फळे आणि भाजी मंडईचा पुरवठा करणाऱ्या जांबळी नाका भाजी मंडईच्या आवारात अवैध फेरीवाले बसू लागले आहेत.

मंडईतील व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर याचा परिणाम होऊ लागला आहे. या संदर्भात महापालिका प्रशासनाकडे तक्रारी करूनही विक्रेत्यांवर कोणतीही कारवाई होत नसल्याने व्यापाऱ्यांनी १५ एप्रिलपासून बेमुदत भाजी मंडई बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे फळे व भाजीपाला पुरवठ्यावर परिणाम होण्याची चिन्हे आहेत.

ठाण्यातील जांबळी नाका परिसरात फळ आणि भाजीपाला मार्केट आहे. 250 हून अधिक फळे आणि भाजी विक्रेते अनेक वर्षांपासून येथे व्यवसाय करत आहेत. व्यापाऱ्यांच्या दोन संघटना येथे कार्यरत आहेत. त्यामध्ये छत्रपती शिवाजी मैदान भाजी विक्रेता सेवा संघ आणि जिजामाता फळ व भाजी विक्रेता सेवा संघ यांचा समावेश आहे. या भाजी मंडईच्या आजूबाजूला रस्त्यावर फळे, भाजीपाला विक्रीचा व्यवसाय अवैध विक्रेते करत आहेत.

कोरोनाच्या काळापासून हे स्टॉल्स बसले आहेत. या फेरीवाल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हे फेरीवाले पहाटे साडेतीन ते दहा वाजेपर्यंत आपला व्यवसाय करतात. त्यामुळे भाजी मंडईतील ग्राहकांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे व्यवसायावर परिणाम होत असल्याने व्यापाऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे.


बेकायदा फेरीवाल्यांमुळे रस्त्यावर वाहतूक कोंडीही होते. पहाटे 4 ते 9 या वेळेत भरणाऱ्या या अवैध बाजारामुळे बाजारपेठेतील मुख्य रस्त्यांवरील टीएमटी बस आणि इतर वाहनांची वाहतूक बंद करून ही वाहतूक तळोपाळीमार्गे सोडण्यात येते. त्यामुळे तलावपाळी ते स्टेशन रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊन नागरिकांची गैरसोय होते. याबाबत पालिका आणि पोलीस प्रशासनाकडे तक्रार करूनही या फेरीवाल्यांवर कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे.

फेरीवाले उरलेला भाजीपाला आणि खराब झालेला भाजीपाला कचरा त्याच ठिकाणी टाकतात. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

पालिका आणि पोलीस प्रशासनाकडे तक्रार करूनही या फेरीवाल्यांवर कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोप करत व्यापाऱ्यांनी 15 एप्रिलपासून बेमुदत फळ, भाजी मंडई बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

छत्रपती शिवाजी मैदान भाजी विक्रेते सेवा संघ आणि जिजामाता फळे व भाजी मंडई यांच्यावतीने या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. भाजी विक्रेते सेवा संघाची नुकतीच सर्वसाधारण सभा झाली त्यात हा निर्णय घेण्यात आला.



हेही वाचा

आता जुहू चौपाटी अधिक आकर्षक दिसणार, पालिकेचा 'हा' आहे प्लॅन

ठाणे स्थानकात रेल्वेबरोबरच हेलिकॉप्टरचाही थांबा

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा