Advertisement

ठाणेपालिकेच्या महिला अधिकाऱ्यावर फेरीवाल्याचा जीवघेणा हल्ला, दोन बोटे तुटली

ठाणे महापालिकेच्या ओवळा-माजीवडा प्रभागाच्या अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे या सोमवारी संध्याकाळी माजीवडा परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यावर कारवाई करण्यासाठी गेल्या होत्या.

ठाणेपालिकेच्या महिला अधिकाऱ्यावर फेरीवाल्याचा जीवघेणा हल्ला, दोन बोटे तुटली
(Image: Twitter/ANI)
SHARES

ठाणे महानपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर एका फेरीवाल्याने जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात पिंपळे यांची दोन बोटे तुटली आहेत. तर त्यांच्या दुसऱ्या हाताला आणि डोक्यावर देखील जबर मार लागला आहे. त्यांच्या अंगरक्षकाचंही एक बोट कापलं आहे. फेरीवाल्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ठाणे महापालिकेच्या ओवळा-माजीवडा प्रभागाच्या अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे या सोमवारी संध्याकाळी माजीवडा परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यावर कारवाई करण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी अमरजीत यादव या फेरीवल्याने त्यांच्यावर अचानक चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांची 2 बोटे आणि त्यांच्या अंगरक्षकाचे 1 बोट तुटले. त्यानंतर त्यांना तातडीने वेदांत रुग्णालयात आणि त्यानंतर ज्युपिटर रुग्णालयात दाखल केले.

अचानकपणे हल्ला झाल्यामुळे पिंपळे घाबरल्या. त्यांनी स्वत:चा बचाव करण्यासाठी आपला डावा हात वर केला. याचवेळी फेरीवाल्याने धारदार शस्त्राने केकेल्या हल्यात पिंपळे यांच्या डाव्या हाताची दोन बोटे तुटून पडली. याआधी माथेफिरू फेरीवाला आक्रमक झाल्याचे समजताच पिंपळे यांचा सुरक्षारक्षक सतर्क झाला होता. फेरीवाल्याने हल्ला केल्यानंतर पिंपळे यांचा सुरक्षारक्षक मध्ये आला. यावेळी सुरक्षारक्षकचेही एक बोट तुटले आहे.

स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी फेरीवाल्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने स्वतःच्या गळ्यावर चाकू ठेवून त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी अत्यंत शिताफीने यादव याला अटक केली.

पालिकेची कारवाई सुरू असताना या माथेफिरू फेरीवाल्याची गाडी कारवाई करण्यास गेलेल्या पथकाने जप्त केली होती. त्याचाच राग मनात धरून हा हल्ला झाल्याची माहिती आहे. या प्रकरणी कासारवडवली पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा