दीड वर्ष उलटूनही 'हे' वाहनतळ बंद अवस्थेत

चेंबूर पूर्व येथील महापालिकेच्या एम-पश्चिम वॉर्डशेजारील महानगरपालिकेचे वाहनतळ बांधून दीड वर्ष उलटले. मात्र, तरीही सर्वसामान्यांसाठी हे वाहनतळ अद्याप खुले करण्यात आलेले नाही.

SHARE

मुंबईतील रस्त्यांच्याकडेला होणाऱ्या वाहनांच्या पार्किंगमुळं मोठ्या प्रमाणात वाहतुककोंडी निर्माण होते. ही वाहतुककोंडी कमी करण्यासाठी महापालिकेनं सार्वजनिक वाहनतळांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. वाहनचालकांना आपली वाहनं या सार्वजनिक वाहनतळांमध्येच पार्क करायची आहेत. मात्र, काही वाहनतळांबाबत अजूनही वाहनचालक नाराजी व्यक्त करत आहेत. चेंबूर पूर्व येथील महापालिकेच्या एम-पश्चिम वॉर्डशेजारील महानगरपालिकेचे वाहनतळ बांधून दीड वर्ष उलटले. मात्र, तरीही सर्वसामान्यांसाठी हे वाहनतळ अद्याप खुले करण्यात आलेले नाही.

पार्किंगचा प्रश्न

चेंबूर पूर्व येथील महापालिकेच्या एम-पश्चिम वॉर्डशेजारी असलेल्या जागेत जलतरण तलाव व त्याला लागूनच २०१८मध्ये वाहनतळ बांधण्यात आलं. जलतरण तलावाचं उद्घाटन करून ते सर्वसामान्यांसाठी खुलं करण्यात आलं. मात्र, अद्याप वाहनतळ बंद ठेवण्यात आलं आहे. त्यामुळं या परिसरात पार्किंगचा प्रश्न उपस्थित झाला असून, महापालिका हे वाहनतळ नेमकं कधी सुरू करणार याकडं सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.

पार्किंग उपलब्ध

जलतरण तलाव व वाहनतळाचं नूतनीकरण होण्याआधी सर्वसामान्यांसाठी या ठिकाणी पार्किंग उपलब्ध होती. चेंबूर स्थानक परिसरात येणारे नागरिक वाहनं इथं पार्क करत होते. स्थानकाजवळील मार्ग क्रमांक १ तसंच, आंबेडकर उद्यान येथील अनधिकृत पार्किंगचं प्रमाण कमी होतं. २०१५ साली या जागेचं नूतनीकरण सुरू झालं व पार्किंग बंद करण्यात आलं. त्यामुळं या परिसरात अनधिकृत पार्किंगचं प्रमाण वाढलं.

अनधिकृत पार्किंग

अनधिकृत पार्किंगचं प्रमाण वाढत असल्यानं पादचारी आणि वाहनचालकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. एम-पश्चिम वॉर्डशेजारील जनरल अरुणकुमार वैद्य जलतरण तलाव इथं असणारं हे वाहनतळ सुरू केल्यास परिसरातील अनधिकृत पार्किंगचं प्रमाण कमी होणार आहे.हेही वाचा -

खातेवाटपाचा तिढा सुटला? लवकरच घोषणेची शक्यता

धक्कादायक! 'तो' सेल्फी बघून पुरूषाने पुरूषावरच केला बलात्कारसंबंधित विषय
ताज्या बातम्या