Advertisement

'मेट्रो-३'च्या कामामुळं 'या' इमारतीला तडा

मेट्रो-३ प्रकल्पाच्या कामामुळं आता नजीकच्या रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे

'मेट्रो-३'च्या कामामुळं 'या' इमारतीला तडा
SHARES

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या 'मेट्रो३' प्रकल्पाअंतर्गत कुलाबा ते सीप्झ या भुयारीमार्गासाठी ठिकठिकाणी खड्डे खणण्यात येत आहेत. मोठ-मोठ्या मशीनचा वापर करून हे खड्डे खणले जात आहेत. मात्र, या कामामुळं आता नजीकच्या रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. या मेट्रो-३ प्रकल्पाच्या कामामुळं माहीम येथील लक्ष्मी निवास इमारतीला धोका निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे.

घर सोडण्याची वेळ

मेट्रोच्या कामामुळं इमारतीला तडे गेले आहेत. त्यामुळं या इमारतीमधील २५ कुटुंबांवर घर सोडण्याची वेळ आली आहे. काहींनी आपल्या नातेवाईकांकडं आश्रय घेतला असून, काहींची व्यवस्था मेट्रोने जवळच्या हॉटेलात केल्याची माहिती मिळते. माहीम पॅराडाइज सिनेमा इथं 'मेट्रो ३'च्या शीतलादेवी स्थानकाचं बांधकाम सुरू आहे. लगतच खासगी मालकीची लक्ष्मी निवास ही इमारत आहे. रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास इमारतीचा पाया काही प्रमाणात खचला.

हेही वाचा - ‘असं’ आहे मुंबईच्या पोटातून धावणाऱ्या मेट्रोचं रुप

इमारत रिकामी

या घटनेची माहिती मिळताच रहिवाशांनी हेल्पलाइनवर संपर्क साधला. त्यानंतर मेट्रोचे इंजिनीअर, म्हाडा तसेच पालिका वॉर्ड कार्यालयाचे अधिकारी व अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. एकूणच गांभीर्य लक्षात घेता, सर्वच कुटुंबांना त्यावेळी इमारत रिकामी करण्यास सांगण्यात आलं. काहींची व्यवस्था परिसरातील हॉटेलांमध्ये करण्यात आली, तर काहींनी आपल्या नातेवाईकांकडं धाव घेतली. तसंच, काहींनी भाड्याचे घर देण्याची मागणी केली. अशांना भाड्याच्या घराची रक्कम देण्यात आली. मात्र, इमारत स्थिती धोकादायक असुनही काही कुटुंबांनी घर सोडण्यास नकार दिला आहे.

हेही वाचा - मेट्रो ३ प्रकल्पाच्या ३२ भुयारी टप्प्यांपैकी २२ पूर्ण

४ दुकानंही बंद

या इमारतीच्या तळमजल्यावरील ४ दुकानंही बंद करण्यात आली आहेत. ज्या कुटुंबियांनी इमारत सोडण्यास नकार दिला आहे. त्यांनी याआधी मेट्रोचं काम हळू करण्याची मागणी केली होती. मात्र, या मागणीकडं अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप या कुटुंबियांनी केला आहे. दरम्यान, या घटनेनंतर मेट्रोनं दरदिवशी प्रतिव्यक्ती निवासासाठी एक हजार रुपये तर जेवणासाठी ५०० रुपये 'मेट्रो'नं देऊ केले आहेत. हे पैसे एनएफटीच्या माध्यमातून बँक खात्यांमध्ये जमा केले जाणार आहेत. लक्ष्मी निवास इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू असून २ दिवसांत अहवाल प्राप्त होणार आहे. त्यानंतर इमारतीची डागडुजी केली जाणार आहे.



हेही वाचा -

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एसटी, रेल्वे स्थानकांत सीसीटीव्ही

राष्ट्रवादीला सत्तास्थापनेचं निमंत्रण, पण संख्याबळाचं काय?



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा