Advertisement

रासायनिक अपघातांचा सामना करण्यास मुंबई अग्निशमन दल सज्ज


रासायनिक अपघातांचा सामना करण्यास मुंबई अग्निशमन दल सज्ज
SHARES

मागील आठवड्यात मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेमध्ये एका डिझेलच्या साठवणूक टाकीला लागलेली आग नियंत्रणात आणण्यासाठी मुंबई अग्निशमन दलाने बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेनंतर आता अग्निशमन दल रासायनिक आगीच्या दुघर्टना तथा अपघात यांचा सामना करण्यासाठी सज्ज झाली आहे. मुंबईतील वाढते उद्योग धंदे आणि कारखाने यामधून रासायनिक द्रव्यांमुळे लागलेली आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्यासाठी आता स्वतंत्र हॅजमेंट वाहन खरेदी केले जात आहे.


रासायनिक अपघात हाताळण्यासाठी हॅजमेंट वाहन

मुंबईत मोठ्याप्रमाणात लोकसंख्येमध्ये वाढ झालेली असून यामुळे कंपन्या आणि कार्यालये तसेच कारखान्यांच्या संख्येतही वाढ होत आहे. मुंबईत असलेले तेल शुद्धीकरण कारखाने, रासायनिक खतांचे कारखाने आणि इतर औद्योगिक उद्योग यामुळे वेळोवेळी रासायनिक आगींच्या अपघातांना अग्निशमन दलाला तोंड द्यावे लागते. त्यामुळे असे रासायनिक अपघात झाल्यास ते हाताळण्यासाठी हॅजमेंट या विशेष प्रकारच्या वाहनाच्या खरेदीला मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.

संपूर्ण जगामध्ये रासायनिक अपघात आणि रासायनिक आपत्कालिन परिस्थिती हाताळण्यासाठी हे हॅजमेंट वाहन वापरण्यात येते. या वाहनामध्ये विशेष प्रकारची उपकरण, विशेष प्रकारचा गणवेश, केमिकल्स न्युट्रिलायझर साधने, डिकन्टॅमिनेशन चेंबर इत्यादींचा समावेश आहे. अणुउर्त्सजन झाल्यास ते तपासण्यासाठी या वाहनात उपकरण उपलब्ध असल्याचीही माहिती स्थायी समितीच्या बैठकीत उपस्थित अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी यांनी दिली.

सुमारे ५ कोटी ३६ हजार रुपयांमध्ये या हॅजमेंट वाहनाची खरेदी केली जात असून पाच वर्षाँच्या देखभालीसह हा कंत्राट खर्च ८ कोटी रुपयांपर्यंत जाणार आहे. स्लोव्हेनियाच्या वेबो मॅरीबॉर डीओओ या कंपनीकडून या वाहनाची खरेदी केली जाणार आहे.


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा