आयआयटी मुंबईत पर्रिकरांना श्रद्धांजली

'आयआयटी' मुंबईत गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. आज संध्याकाळी ५ वाजता आयआयटी मुंबईतील पी. सी. सक्सेना सभागृहात शोकसभेचं आयोजन करण्यात आलं आहे.

आयआयटी मुंबईत पर्रिकरांना श्रद्धांजली
SHARES

'आयआयटी' मुंबईत गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. आज संध्याकाळी ५ वाजता 'आयआयटी' मुंबईतील पी. सी. सक्सेना सभागृहात शोकसभेचं आयोजन करण्यात आलं आहे. शनिवारी रात्री पर्रिकर यांचं दीर्घ आजारानं निधन झालं. त्यांची कर्करोगाशी अनेक दिवसांची झुंज अपयशी ठरली.

आज संध्याकाळी ५ वाजता मनोहर पर्रिकर यांना 'आयआयटी' मुंबईत श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. संस्तेच्या प्रवक्त्यांनी याबाबत माहिती दिली. यापूर्वी पर्रिकर यांनी २०१७ मध्ये संस्थेच्या ५५ व्या दीक्षांत समारंभात विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केलं होतं. पर्रिकरांच्या निधनानं दु:ख झाल्याचं 'आयआयटी'ने दिलेल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. तसंच पर्रिकर हे उत्कृष्ट विद्यार्थी होते, तसंच ते 'आयआयटी' मुंबईशीही जोडलेले असल्याचंही शोकसंदेशात नमूद करण्यात आलं आहे.

गोवा 'आयआयटी'च्या स्थापनेतही पर्रिकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. तसंच २०१४ साली माजी विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या समारंभात देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल त्यांना गौरवण्यात आलं होतं.हेही वाचा - 

साधा माणूस ते मुख्यमंत्री

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचं निधनसंबंधित विषय