Advertisement

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचं निधन


गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचं निधन
SHARES
Advertisement

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचं रविवारी संध्याकाळी निधन झालं. शनिवारपासून त्यांच्या तब्येती बद्दल निरनिराळ्या अफवा उठल्या होत्या. पण रविवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

पर्रिकर यांना स्वादुपिंडाच्या कर्करोगाने ग्रासले होते. त्यानंतर अनेक दिवस त्यांनी अमेरिकेत उपचार घेतले होते. अशाच परिस्थितीत त्यांनी गोव्याचा कारभाराचा गडाही हाकला होता. त्यातच त्यांनी गोव्याचा अर्थसंकल्प देखील मांडला होता. परंतु गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. तसच डॉक्टरांकडून ही त्यांची तब्येत स्थिर असून ते केवळ डोळे उघडत असल्याचे सांगण्यात आलं होतं.

गेल्या काही दिवसांपासून त्यांना रक्तदाबाचा त्रास होत होता. त्यात त्यांचा रक्तदाब कमी झाल्याचंही डॉक्टरांकडून सांगण्यात आलं होत. त्यानंतर त्यांना कृत्रिम ऑक्सिजन देण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत थोडी सुधारणा झाली होती. त्यानंतर शनिवारी त्यांची प्रकृती पुन्हा खालावली. रविवारी त्यांच्या निवासस्थानी त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचेही मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आलं होत. परंतु त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि त्यांनी रविवारी अखेरचा श्वास घेतला. 

त्यांनी यापूर्वी देशाचं संरक्षण मंत्रिपदही भूषवल होत. त्यांची संरक्षण मंत्री म्हणून कामगिरी उत्तम होती. तसच त्यांच्या कार्यकाळात सर्जिकल स्ट्राईकही करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा ते आपल्या राज्यात परतले होते. तेव्हा त्यांच्याकडे पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची धुरा सोपवण्यात आली होती


गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनाने भारतीय जनता पार्टीने एक सच्चा कार्यकर्ता आणि श्रेष्ठ नेता गमावला आहे. मनोहर पर्रिकर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गोव्यात भाजपाची उभारणी केली व पक्षाला सत्तेवर आणले. त्यांनी गोव्याला राजकीय स्थैर्य दिले आणि स्वच्छ – पारदर्शी प्रशासनाच्या माध्यमातून या राज्याला प्रगतीच्या मार्गावर नेले. देशाचे संरक्षणमंत्री म्हणून मनोहर पर्रिकर यांची कारकीर्द महत्त्वाची होती.

- खा. रावसाहेब पाटील दानवे, प्रदेशाध्यक्ष, भाजपा.

संबंधित विषय
Advertisement