Advertisement

रेल्वे स्थानकातील फेरीवाल्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

मुंबईतील रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांचा मुद्दा पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्याता आहे.

रेल्वे स्थानकातील फेरीवाल्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
SHARES

मुंबईतील रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांचा मुद्दा पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्याता आहे. पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट सब वेमध्ये मोठ्या प्रमाणात असलेल्या फेरीवाले बसतात. या फेरीवाल्यांमुळं गर्दीच्या वेळी प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. या फेरीवाल्यांमुळं चेंगराचेंगरी घडून अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळं महापालिकेनं कारवाई करून या फेरीवाल्यांना हटवण्याची मागणी प्रवाशांकडून वारंवार केली जाते. मात्र, या फेरीवाल्यांना हटवण्यात महापालिका अपयशी ठरत आहे, असा आरोप पश्चिम रेल्वेनं केला आहे.

चर्चगेट रेल्वे स्थानकातील सब-वेमध्ये मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांनी बस्तान मांडलं आहेत. त्यामुळं सकाळी आणि संध्याकाळी इथं अनावश्यक गर्दी निर्माण होते. परणामी सब वेमधून स्थानक गाठण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागतो. अनेक प्रवासी केवळ गर्दी टाळण्यासाठी मुख्य रस्ता ओलांडण्याला प्राधान्य देतात. ही परिस्थिती कायम राहिल्यास सब वेमध्ये चेंगराचेंगरी होण्याची भीती पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ) जवानांना सांगून रेल्वे स्थानकांप्रमाणेच रेल्वे परिसरातील फेरीवाल्यांवरदेखील कारवाई शक्य आहे. मात्र, हे फेरीवाले महापालिका हद्दीत असल्यामुळं त्यांच्यावर कारवाई करण्याची मुभा 'आरपीएफ'ला नाही.

महापालिकेला अनेकदा फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी पत्र व्यवहार करण्यात आला आहे. मात्र, त्याबाबत ठोस कारवाई करण्याच येत नसल्याचं चित्र आहे. याप्रकरणी, पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी लवकरच मुंबई महापालिका आयुक्त यांची भेट घेणार आहेत. रेल्वे स्थानकापासून १५० मीटरवर फेरीवाल्यांनी बसू नये, असा आदेश अनेकदा न्यायालयानं दिला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय फेरीवाला धोरणातही हे स्पष्ट करण्यात आलं आहे. तरीदेखील मुंबई रेल्वेवरील अनेक रेल्वे स्थानक परिसरांत या आदेशाची पायमल्ली होताना दिसून येते. याचा त्रास सर्वसामान्यांना होत असून, त्यांना गर्दीतूनच मार्ग काढावा लागतो. अनेकदा गर्दीचा फायदा घेत महिला प्रवाशांना छेडछाडीला सामोरे जावं लागतं.

रेल्वे स्थानक आणि परिसरात मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांचा वावर असतो. अनेकदा फेरीवाल्यांकडून खाद्यपदार्थांचीदेखील विक्री होते. मात्र, त्यांवर कोणत्या यंत्रणेचं बंधन नसल्याचं वास्तव आहे. यामुळं पश्चिम रेल्वे आक्रमक भूमिका घेणार असल्याची माहिती मिळते.


हेही वाचा -

२६/११ प्रकरणाची फेरचौकशी करा, भाजपच्या नेत्याची मागणी

सरकत्या जिन्यांकडे रेल्वे प्रशासनाचं दुर्लक्षसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा