Advertisement

राज्यात कोरोनातून मुक्त झालेल्यांची संख्या १३ लाखांवर

कोरोना रुग्णांची संख्या देखील कमी होऊन २ लाख ५ हजार ४१५ एवढी कमी झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

राज्यात कोरोनातून मुक्त झालेल्यांची संख्या १३ लाखांवर
SHARES

राज्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १३ लाखांच्या उंबरठ्यावर असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४ टक्क्यांवर पोहोचले आहे.  आजही सलग दुसऱ्या दिवशी नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या दुप्पट नोंदवली गेली आहे. दिवसभरात ८ हजार ५२२ नवीन रुग्ण आढळून आले तर त्याच्या दुप्पट १५ हजार ३५६ रुग्ण बरे होऊन घरी  गेले.  रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८४.३ टक्के एवढे झाले आहे. राज्यातील उपचाराखाली असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या देखील कमी होऊन २ लाख ५ हजार ४१५ एवढी कमी झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

हेही वाचाः- MPSC ची नोव्हेंबरमधील परीक्षाही पुढे ढकलली

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७७ लाख ६२ हजार ००५ नमुन्यांपैकी १५ लाख ४३ हजार ८३७ नमुने पॉझिटिव्ह ( १९.८९ टक्के) आले आहेत. राज्यात  २३ लाख ३७ हजार ८९९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २५ हजार ८५७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज १८७ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे. मुंबईसह देशभरात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी सरकारनं लोकांना मास्क, सामाजिक अंतर आणि अनेक नियमांचं पालन करण्याचे आदेश दिले आहेत. यासह कोरोनाच्या नियमांची जनजागृती व्हावी म्हणून मोहीम देखील राबवली जात आहे. 

हेही वाचाः- मुंबई, ठाण्यात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून सर्तकतेचा इशारा

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी महाविद्यालयातील एनडीआरएफ आणि एनएसएस युनिटच्या वतीनं १३ ऑक्टोबर रोजी जनजागृती मोहीम राबवली जात आहे. यात कांदिवलीच्या निरांजना मजीठिया महाविद्यालयातील विद्यार्थी या मोहिमेत सहभागी होते. जनजागृती अभियान मथुरादास रोड - अतुल टॉवर - शिवाजी रोड - एम.जी. इथं राबवण्यात आलं. सकाळी ११.३० वाजता जनजागृती मोहीम सुरू झाली. एनडीआरएफच्या अधिकाऱ्यासंह महाविद्यालयीन विद्यार्थी आणि शिक्षकांनीही या मोहिमेत भाग घेतला.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा