Advertisement

निर्बंध, सुट्ट्यांमुळे लोकलच्या प्रवासी संख्येत घट

मुंबईत कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढू लागला आहे. यामुळं व सध्या नाताळच्या निमित्तानं सुरू असलेल्या पार्ट्यांच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनानं निर्बंध लावले आहेत.

निर्बंध, सुट्ट्यांमुळे लोकलच्या प्रवासी संख्येत घट
SHARES

मुंबईत कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढू लागला आहे. यामुळं व सध्या नाताळच्या निमित्तानं सुरू असलेल्या पार्ट्यांच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनानं निर्बंध लावले आहेत. या निर्बंधामुळं मुंबईच्या लोकल सेवेवर परिणाम झाल्याची माहिती समोर येत आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील दोन्ही प्रवासी घटले आहेत.

मुंबईत लागू झालेले रात्रीचे निर्बंध, कोरोना आणि ऑमिक्रॉन रुग्णांची वाढती संख्या यामुळे मुंबईकरांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झालं आहे. कोरोना, ऑमिक्रॉनची भीती आणि पर्यटनाला गेलेले मुंबईकर यामुळे उपनगरीय प्रवाशांच्या संख्येत १६ लाखांची घट झालेली आहे.

पश्चिम रेल्वेवर गेल्या आठवड्यात २६ लाखांहून अधिक प्रवासी संख्या नोंदवण्यात आली होती. आता ही संख्या साडे १५ लाखांपर्यंत खालावली आहे.

मध्य रेल्वेच्या प्रवासी संख्येतही सहा लाखांची घट झाल्याने प्रवासी संख्या २६-२७ लाखांपर्यंत कमी झाल्याचं रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, नाताळ सुट्टी, नववर्षाचं स्वागत करण्यासाठी मुंबईकर मोठ्या संख्येने आधीच मुंबईबाहेर पडले आहेत. ३० किंवा ३१ डिसेंबर रोजी प्रवासासाठी बाहेर पडणाऱ्यांची गर्दी आणि त्यामुळे होणारी वाहनकोंडी टाळण्यासाठी कित्येक दिवस आधीपासून रिसॉर्ट, हॉटेलचे बुकिंग करण्यात आले आहे. त्यामुळ‌ेही लोकल प्रवासी संख्या घटल्याचे दिसून आले आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा