
मुंबईत (mumbai) दुबार मतदारांचा शोध घेण्याची मोहीम मुंबई महानगरपालिकेने (bmc) हाती घेतली आहे. आतापर्यंत राबवण्यात आलेल्या मोहिमेत 11 लाख दुबार मतदारांपैकी 1 लाख 25 लाख दुबार मतदार असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, दुबार मतदारांची शोध घेण्याबाबत पालिकेला सूचना केली होती. त्यानुसार दुबार मतदारांची शोध मोहीम राबवण्यात येत आहे.
प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेच्या दोन दिवस आधी पर्यंत ही मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाचे (Election committe) सचिव सुरेश काकाणी यांनी सांगितले.
मतदार यादीत घोळ, दुबार मतदार या मुद्द्यावरुन विरोधकांनी राज्य निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला आहे.
मुंबईत 1 कोटी 3 लाख मतदार आहेत. त्यापैकी 11 लाख मतदार दुबार असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
अखेर दुबार मतदारांचा शोध घेण्याची सूचना राज्य निवडणूक आयोगाने मुंबई महानगरपालिका प्रशासनाला दिले. मतदार यादीतील (voter list) दुबार नावांना दोन स्टार करण्यात आले आहे.
दुबार नावे शोधून त्या मतदारांकडून हमी पत्र लिहून घ्यावे, फोटो तपासावा, अशा सूचना मुंबई महानगरपालिका प्रशासनाला केल्या होत्या. त्यानुसार मुंबई महानगरपालिकेने शोध मोहीम हाती घेतली आहे.
साधारण आठ ते दहा टक्के मतदार दुबार आढळून आले आहेत. दुबार मतदारांचा (Fake voters) शोध घेण्याची मोहीम मतदानाच्या दोन दिवस आधीपर्यंत सुरू राहणार असल्याचे काकाणी यांनी सांगितले.
एका व्यक्तीचे नाव किती वेळा आणि कोणत्या प्रभागात नाव, वडिलांचे नाव, लिंग आणि फोटो सारखे तर दुबार नावांचा शोध
बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-2025 च्या प्रभाग प्रारुप मतदार यादीबाबत एकूण 11 हजार 497 हरकती व सूचना प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी 10 हजार 668 हरकती व सूचनांवर निर्णय देण्यात आला आहे.
तर, उर्वरित 829 हरकती व सूचना दुबार मतदारांबाबत आहेत, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी दिली.
हेही वाचा
