Advertisement

मुंबईतल्या 'या' ८ मॉल्समध्ये करा रात्रीची पार्किंग

ज्या रहिवाशांना त्यांच्या इमारतीत किंवा त्यांच्या इमारतीजवळ पार्किंगची जागा नाही, अशांसाठी मुंबईतील मॉल उपलब्ध असतील.

मुंबईतल्या 'या' ८ मॉल्समध्ये करा रात्रीची पार्किंग
(Representational Image)
SHARES

मुंबईकरांचा आता गाड्यांच्या पार्किंगचा मोठा प्रश्न सुटणार आहे. ज्या रहिवाशांना त्यांच्या इमारतीत किंवा त्यांच्या इमारतीजवळ पार्किंगची जागा नाही, अशांसाठी मुंबईतील मॉल उपलब्ध असतील.

रात्रीच्या वेळी मॉलच्या पार्किंगमध्ये खासगी वाहनं पार्क करण्यास परवानगी देण्यात येणार आहेत. शहरातील ८ मॉल्स रात्री ११ ते सकाळी ८ या वेळेत नागरिकांना त्यांच्या मॉलच्या आवारात गाड्या पार्क करण्याची परवानगी देणार आहेत.

मॉल्मसमध्ये पार्किंगला परवानगी देण्याचा प्रस्ताव मुंबई पार्किंग प्राधिकरणाचा आहे, ज्याला आता आठ मॉल्सनं मान्यता दिली आहे. मुंबईत विशेषतः रात्रीच्या वेळी सर्व रस्त्यांच्या कडेला गाड्या पार्क केलेल्या दिसतात. कारण अनेक इमारतींमध्ये रहिवाशांसाठी पुरेशी पार्किंगसाठी जागा नाही.

खालील आठ मॉल्स उपलब्ध होणार

  • कांदिवली ग्रोवेल्स 101 मॉल
  • अंधेरी इन्फिनिटी मॉल
  • मालाड इनॉर्डबिट मॉल
  • कुर्ला फिओनिक्स मार्केटसिटी
  • घाटकोपर आर सिटी मॉल,
  • मुलुंड आर मॉल
  • लोअर परळमधील फिनिक्स मॉल

मॉल्स त्यांच्या जागेवर कार पार्किंगसाठी शुल्क आकारणार आहेत. रात्रीच्या वेळी मॉल्समध्ये पार्किंग मोफत असणार नाही. या पॅकिंगसाठी काही मॉल्स दरमहा जवळपास २,५०० ते ३,५०० रुपये आकारतील. तर काही मॉल्समध्ये फक्त आठवड्याचा पास असेल.

प्रस्तावाअंतर्गत, मॉलमध्ये ओला आणि उबेर कॅबसाठीही पार्किंगची व्यवस्था केली जाईल. मात्र त्याची रीतसर परवानगी अद्याप मिळालेली नसून त्यावर चर्चा सुरू आहे.

मुंबईतील रस्त्यांवरील गाड्यांची गर्दी कमी करण्यासाठी पार्किंग प्राधिकरण प्रयत्न करत आहे. अनेक मॉल्सना त्यांच्या पार्किंगची जागा सार्वजनिक वापरासाठी देण्यास सांगण्यात आलं होतं. तर महापालिकेनं सुद्धा शहरातील गाड्यांसाठी बहुमजली पार्किंग व्यवस्था उभारण्याचं कामं हाती घेतली आहेत.



हेही वाचा

फ्रंटलाईन वर्कर्सना बूस्टर डोस देण्याचा पालिकेचा प्रस्ताव

कफ परेडमधील फुटपाथ उजळणार, एलईडी लाईट्स उभारणार

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा