01/8

मुंबईत मध्यरात्री एका बसची काच फोडण्यात आली होती. अशाच प्रकारे आतापर्यंत ९ बसेसचे नुकसान झाले आहे. धारावी, मानखुर्द, शिवाजी नगर, चारकोप, ओशिवरा, देवनार, इनॉर्बिट मॉल अशा विविध भागात या तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत.
02/8

महाराष्ट्र बंदमुळे बेस्ट बस आगारातच उभ्या आहेत.
03/8

बस बंद असल्यानं प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.
04/8

बेस्टच्या व्यवस्थापनानं पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. परिस्थितीचा आढावा घेऊनच सर्व आगारातून बसगाड्या चालवण्यात येणार आहेत.
05/8

जय हिंद पार्टीच्या बाळासाहेब भोसलेंनी ठाण्याच्या इस्टर्न एक्सप्रेम हायवेजवळ रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला.
06/8

महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी शांतता होती. दुकानं देखील बंद ठेवण्यात आली होती.
07/8

अनेक ठिकाणी टॅक्सी सेवा सुरू आहे. बस बंद असल्यानं टॅक्सीसाठी नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. फोटोमध्ये तुम्ही टॅक्सीसाठी साईन लागली आहे हे बघू शकता. पण अधिक भाडे आकारले जात असल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे.
08/8

लखीमपूर हिसाचाराप्रकरणी ठिकठिकाणी भाजपा विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.