'पेग, पेंग्विन आणि पार्टी'

  Pali Hill
  'पेग, पेंग्विन आणि पार्टी'
  मुंबई  -  

  मुंबई - भाजपाचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचं नाव न घेता टीका केलीय. मुंबईमध्ये रात्रीची हॉटेल्स, इमारतीच्या गच्चीवर पार्टी करण्याची मागणी आणि पेंग्विनचा अट्टहास यांवर त्यांनी टीकास्त्र सोडलंय. "असेही लोक आहेत जे पेग, पेंग्विन आणि पार्टीमध्येच अडकलेत. याच्या पुढचा विचार ते करूच शकत नाहीत," असं शेलार यांनी म्हटलंय.

  शेलार यांनी एका पत्रकार परिषदेत राज्य सरकारच्या दोन वर्षाचा कामांचा आलेख मांडला. "मागील सरकारला 1 मेट्रो आणि 1 मोनो बनवायला 12 वर्ष लागली. आमच्या सरकारनं 60 आठवड्यात 3 मेट्रोची कामं सुरू केली. भाजपाच्या काळात मुंबईमध्ये 52 उड्डाणपूल बनले जर ते बनले नसते तर काय परिस्थिती झाली असती याचा अंदाज करू शकत नाही. मुंबईचा 60 वर्षांचा बॅकलॉग भरायला भाजपनं सुरुवात केलीय. कोस्टल रोड आणि बेस्ट बसेससाठी कॉरिडोरही बांधण्याचं काम सुरू आहे. मुंबईमध्ये परवडणारी घरे बनवण्यासाठी देवेंद्र फडणवीस कटिबद्ध आहेत मात्र काही जण याचा विरोध करत आहेत. हे झारीचे शुक्राचार्य कोण आहेत त्यांना उघड करणं गरजेचं आहे," असंही शेलार म्हणाले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.