अंधेरी - एकाच नंबरच्या तीन बसना अंधेरी आरटीओनं ताब्यात घेतलंय. 1 डिसेंबर म्हणजेच गुरुवारी दोन बस पकडल्या. तर शनिवारी एक बस पकडली. या तिन्ही बसवर MH. 04. FK.73 या नंबरची प्लेट होती. त्यामुळे अंधेरी आरटीओनं या बसना ताब्यात घेतलंय.
"टॅक्सपासून वाचण्यासाठी बस मालक हे पाऊल उचलतात. अशा एक नाही तर अनेक गाड्या आहेत," असं आरटीओ अधिकारी आनंद राव यांनी स्पष्ट केलं.