Advertisement

नवी मुंबईत इमारतीचा स्लॅब कोसळून ३ जण जखमी


नवी मुंबईत इमारतीचा स्लॅब कोसळून ३ जण जखमी
SHARES

नवी मुंबईच्या दारावे गावातील स्वप्न साकार या ३ मजली इमारतीची डागडुजी सुरू असताना दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटचा स्लॅब कोसळून ३ जण जखमी झाल्यची घटना बुधवारी दुपारी घडली. अनुसया चव्हाण (६०), सुमिती चव्हाण (३४), प्रितम चव्हाण (४०) अशी जखमींची नावं असून त्या एकाच कुटुंबातील आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या तेरणा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.   


कधी घडली घटना?

बुधवारी दुपारी ३.१५ वाजेच्या सुमारास दारावे सेक्टर २३ येथील स्वप्न साकार इमारतीच्या 'ए' विंगच्या दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक २०३ चा स्लॅब पहिल्या मजल्यावर कोसळला. या स्लॅबच्या वजनामुळे काही वेळातच पहिल्या मजल्यावरील स्लॅब तळ मजल्यावर कोसळला. यावेळी घरात चव्हाण कुटुंबातील तिघेजण उपस्थित होते. अचानक घडलेल्या या घटनेमुळे इमारतीतील रहिवासी भयग्रस्त झाले. इमारतीतील इतर रहिवाशांनी जखमींना त्वरीत जवळच्या रुग्णालयात हलवलं. 


रहिवाशांकडे दुर्लक्ष

ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी इमारतीच्या डागडुजीचं काम सुरू होतं. ही इमारत १९९७ साली बांधलेली आहे. इमारत धोकादायक झाल्याने रहिवाशांकडून ३ वर्षांपासून या इमारतीच्या पुनर्बांधणीची मागणी होत आहेत. परंतु स्थानिक प्रशासनाकडून पुनर्बांधणीची मंजूरी न मिळाल्याने इमारतीची डागडुजी सुरू होती.

ही घटना घडल्यानंतर नेरुळ पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव इमारत रिकामी करून रहिवाशांना बेलापूरच्या रात्री निवारा केंद्रात पाठवलं.



हेही वाचा-

राणीबागेतील पिंजऱ्याच्या बांधकामासाठी वादग्रस्त ‘हायवे’ कंपनीचं सिलेक्शन



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा