Advertisement

चेंबूरमध्ये सेफ्टी टॅंकमध्ये तीन जण अडकले

जमिनीखाली हा सेप्टीक टँक बांधण्यात आला असून बुधवारी सकाळी १०.०८ वाजताच्या सुमारास चेंबूर वाशी नाका म्हाडा कॉलनीजवळ ही दुर्घटना घडली. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली.

चेंबूरमध्ये सेफ्टी टॅंकमध्ये तीन जण अडकले
SHARES

चेंबूरच्या वाशीनाका येथील सेफ्टी टँकमध्ये ट्रक घुसून ३ जण अडकल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. या तिघांची नावं अद्याप समजलेली नसून, घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल आणि आरसीएफ पोलीस दाखल झाले. त्यानंतर  ३ जणांपैकी एकाला बाहेर काढण्यात यश आलं असून अद्याप दोन जण आत अडकले आहेत. यामध्ये एक महिला आणि लहान मुलाचा समावेश आहे. 


जमिनीखाली टँक

हा सेफ्टी टँक जमिनीखाली बांधण्यात आला असून बुधवारी सकाळी १०.०८ वाजताच्या सुमारास चेंबूर वाशी नाका म्हाडा कॉलनीजवळ ही दुर्घटना घडली. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली. येथील रहिवाशांनी तात्काळ अग्निशमन दल आणि पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दल आणि पोलिसांनी धाव घेत एकाला बाहेर काढलं. मात्र, दोन जण अजून अडकले असून त्यांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत.हेही वाचा -

'उर्मिला यांना राजकारणातलं शून्य ज्ञान'– गोपाळ शेट्टी

शिवसेनेकडून जैनांचा अपमान; मिलिंद देवरा यांचा आरोपसंबंधित विषय