Advertisement

शिवसेनेकडून जैनांचा अपमान; मिलिंद देवरा यांचा आरोप

शिवसेनेनं जैन समुदायाचा अपमान केला असून त्यांना या निवडणुकीत धडा शिकवा, असं आवाहन मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी केलं.

शिवसेनेकडून जैनांचा अपमान; मिलिंद देवरा यांचा आरोप
SHARES

शिवसेनेनं जैन समुदायाचा अपमान केला असून त्यांना या निवडणुकीत धडा शिकवा, असं आवाहन मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी केलं. शिवसेना ही अल्पसंख्यांकांच्या विरोधात असून पर्युषण कालावधीत जैन मंदिरासमोर त्यांनी मांसाहार शिजवत जैन धर्माचा अपमान केल्याचंही त्यांनी सांगितलं. मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होतं.


काँग्रेसकडून जैन कार्ड

मिलिंद देवरा यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात हे वक्तव्य करून जैन कार्ड खेळणार असल्याचं स्पष्ट केलंय. जैन समुदायातील अनेक लोक व्यापार क्षेत्रात असून ती भाजपची व्होट बँक मानली जाते. त्यातच शिवसेना-भाजपच्या युतीमुळे ती मतं शिवसेनेच्या पारड्यात पडतील, असं मत व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळं शिवसेनेच्या या भूमिकेचा फायदा घेण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून करण्यात येत आहे. तसंच शिवसेनेची लोकं मतं मागायला येतील तेव्हा त्यांना याचा जाब विचारावा आणि त्याचं उत्तर त्यांना मतपेटीतून द्यावं, असं देवरा म्हणाले.


अरविंद सावंत प्रतिस्पर्धी

दक्षिण मुंबईतून मिलिंद देवरा यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. तर त्यांच्याविरोधात शिवसेनेकडून अरविंद सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गेल्या निवडणुकांमध्ये मोदी लाटेत अरविंद सावंत यांनी बाजी मारली होती. परंतु आता परिस्थिती बदलली असल्यामुळं याठिकाणाहून अरविंद सावंत बाजी मारतील की मिलिंद देवरा हे काही दिवसांतच स्पष्ट होईल.



हेही वाचा -

'उर्मिला यांना राजकारणातलं शून्य ज्ञान'– गोपाळ शेट्टी

मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी ‘महामतदार जागृती’ अभियान



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा