Advertisement

गुरुवारपासून 2 हेल्मेट सोबत ठेवाच, नाहीतर होणार ‘ही’ कारवाई

मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी मुंबईत हेल्मेटसक्ती १५ दिवसांनी करणार हे जाहीर केले होते. त्यानुसार आता दोन हेल्मेट ठेवणे बंधनकारक आहे.

गुरुवारपासून 2 हेल्मेट सोबत ठेवाच, नाहीतर होणार ‘ही’ कारवाई
(Representational Image)
SHARES

मुंबईत 9 जूनपासून हेल्मेट सक्ती लागू करण्यात येते असल्याची माहिती पीटीआयच्या हवाल्यानं देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांना गुरुवारपासून हेल्मेट वापरणं बंधनकारक असणार आहे. फक्त दुचाकी चालवणाराच नव्हे, तर त्याच्या मागे बसलेल्या व्यक्तीलाही हेल्मेट बंधनकारक करण्यात आलंय.

मुंबई पोलीस (Mumbai Police) आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांनी मुंबईतील हेल्मेटसक्तीचा निर्णय आधीच जाहीर केली होता. आता त्याची अंमलबजावीण काटेकोरपणे केली जाणार आहे.

पोलियन रायडरने हेल्मेट घातलेलं नसेल तर त्याचा फटका दुचाकीस्वाराला बसणार आहे. सोबत वाहन चालकाचं लायसन्सही तीन महिन्यांसाठी सस्पेंड करण्यात येईल. 25 मे रोजी एक पत्रक काढत मुंबईमध्ये हेल्मेटसक्ती करणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं.

हेल्मेटसक्तीचं उल्लंघन जे करतील त्यांच्यावर कारवाई होणारच असा इशाराही मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी दिलाय. आता मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाकडून बुधवारपासून हेल्मेटसक्तीच्या अनुशंगाने कारवाईला वेग येणार आहे.

  • हेल्मेट न वापरणाऱ्यांना 500 रुपये दंड
  • तीन महिन्यांसाठी गाडी चालवण्याचा परवानाही रद्द होई
  • बाईकस्वारासह मागे बसणाऱ्यासही हेल्मेट बंधनकारक

मुंबई वाहतूक पोलीस विभागानं 25 मे रोजी एक आदेश काढला होता. या आदेशानुसार, मुंबईमध्ये दुचाकीवरून प्रवास करणारे जे प्रवासी आहेत, त्यांनी हेल्मेट बंधनकारक असेल. यामध्ये चालकासह म्हणजे बाईक रायडरसह मागे बसणाऱ्या व्यक्तीला म्हणजेच पिलिय रायडरला देखील हेल्मेट वापरणं बंधनकारक असणार आहे.

पुढच्या पंधरा दिवसात या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल, असं 25 मे रोजी काढण्यात आलेल्या आदेशात स्पष्ट करण्यात आलं होतं. जे हेल्मेटसक्तीच्या नियमाचं उल्लंघन करतील, त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात येणारे.



हेही वाचा

मुंबईतल्या 'या' 6 रेल्वे स्थानकांवर EV चार्जिंग पॉईंटची सुविधा

मुंबईतल्या ‘या’ विभागांमध्ये ७-८ जूनला पाणीपुरवठा बंद

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा