Advertisement

मुंबईतल्या ‘या’ विभागांमध्ये ७-८ जूनला पाणीपुरवठा बंद

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ने मंगळवार, 7 जूनपासून दक्षिण मुंबईतील काही भागांमध्ये 24 तासांची कपात जाहीर केली आहे.

मुंबईतल्या ‘या’ विभागांमध्ये ७-८ जूनला पाणीपुरवठा बंद
SHARES

मुंबईतील (Mumbai) एफ दक्षिण विभागातल्या अनेक परिसरामध्ये उद्या (मंगळवारी) पाणीपुरवठा (Water supply) बंद राहणार आहे. या परिसरात मंगळवारी सकाळी दहा वाजेपासून ते बुधवारी सकाळी दहा वाजेपर्यंत असा 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

एफ दक्षिण विभागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी जलवाहिनीचे जोडकाम हाती घेण्यात आले आहे. शिवडी बस डेपोसमोर 750 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीवर जोडलेली 600 मिलीमीटर आणि 450 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीचा जोड हा 1500 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीला देण्यात येणार आहे. यामुळे पाणी अधिक वेगाने येण्यास मदत होणार आहे.

तर उत्तर व दक्षिण विभागातील काही परिसरांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.

उद्या सकाळी दहा वाजेपासून ते परवा सकाळी दहा वाजेपर्यंत एफ दक्षिण विभागातील अनेक परिसरामध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. यामध्ये रुग्णायल विभागात के.ई.एम रुग्णालय, बाई जेरबाई वाडिया रुग्णालय, एम.जी.एम रुग्णालयाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

याचप्रमाणे शिवडी फोर्ट मार्ग, शिवडी कोळी वाडा, गाडी अड्डा या परिसरात देखील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहिल. गोलंजी हिल परिसरातील परळ गाव, गं. द. आंबेकर मार्ग, एकनाथ घाडी मार्ग, परळ गाव मार्ग, भगवंतराव परळकर मार्ग, विजयकुमार वाळींभे मार्ग या परिसरातील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.

अभ्युदय नगर परिसरातील अभ्युदय नगर, ठोकरसी जीवराज मार्ग या भागांचा देखील पाणीपुरवठा उद्या बंद राहणार आहे.हेही वाचा

bmc"="" target="_blank">BMC ची 'हर घर दस्तक' मोहीम">कोरोना लसीकरणासाठी BMC ची 'हर घर दस्तक' मोहीम

खुषखबर, मुंबई-पुणे प्रवास आता फक्त अडीच तासात

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा