Advertisement

टोमॅटोच्या दरात 10 ते 15 रुपयांची वाढ

गेल्या आठवडाभरापासून सुरु असलेल्या पावसानं टोमॅटो (Tomato) पिकाचं मोठं नुकसान झालं आहे.

टोमॅटोच्या दरात 10 ते 15 रुपयांची वाढ
SHARES

गेल्या आठवडाभरापासून सुरु असलेल्या पावसानं टोमॅटो (Tomato) पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं सध्या बाजारपेठेत टोमॅटोची आवक घटली आहे. याचा परिणाम दरांवर झाला आहे.

सध्या टोमॅटोच्या दरात 10 ते 15 रुपयांची वाढ झाली आहे. याचा राज्यातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होत आहे. वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये (APMC Market) टोमॅटोचे दर हे प्रतिकिलो 35 ते 40 रुपयांवर गेले असून, किरकोळ मार्केटमध्ये हाच दर 60 ते 70 रुपये प्रतिकिलो झाला आहे.

एपीएमसी घाऊक बाजारात टोमॅटोच्या दरात वाढ झाली आहे. परतीचा पाऊस सुरु असल्यामुळं टोमॅटो पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. पावसामुळं टोमॅटोचं 50 टक्के उत्पादन घटलं आहे. त्यामुळं एपीएमसी बाजारात टोमॅटोचे दर 10 ते 15 रुपयांनी वाढले आहेत.

मागील आठवड्यात 30 ते 32 रुपये प्रति किलो दरानं उपलब्ध असलेले टोमॅटो आता 35 ते 45 रुपयांवर विकले जात आहेत. सततच्या पावसामुळं आवक घटल्यानं भाजीपाल्याचे दर महागले आहेत.

मागील तीन ते चार दिवसांआधी 30 ते 40 रुपये प्रति किलो असलेले टोमॅटोचे दर आज किरकोळ बाजारात 60 ते 70 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळं सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी झळ सोसावी लागत आहे. 



हेही वाचा

मुंबई आणि ठाण्याकडे जाणारा 'हा' मार्ग ४ दिवस बंद, 'हे' आहेत पर्यायी मार्ग

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा