Advertisement

टॉमेटोचे दर 150 रुपये किलो होण्याची शक्यता

पुरवठ्यात सुधारणा होत नसून पावसाळ्यामुळे दर्जाही खालावल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

टॉमेटोचे दर 150 रुपये किलो होण्याची शक्यता
SHARES

टोमॅटोचा भाव आधीच किरकोळ बाजारात 130 प्रति किलोवर पोहोचला आहे आणि आता तो 150 प्रति किलोच्या पुढे जाण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. पुरवठ्यात सुधारणा होत नसून पावसाळ्यामुळे दर्जाही खालावल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

गेल्या पंधरवड्यापासून टोमॅटोच्या दरात वाढ होत आहे. 100 ओलांडल्यानंतर, ते 125 ते 130 प्रति किलोग्रॅमपर्यंत पोहोचले. येत्या काही दिवसांत टोमॅटोचे उत्पादन न वाढल्यास भाव किलोमागे १५० रुपयांच्या पुढे जाण्याची भीती भाजीपाला व्यापारी व्यक्त करत आहेत.

कमी पुरवठ्यामुळे दरवाढ झाली

घाऊक बाजारात टोमॅटोचा पुरवठा कमी झाल्यामुळे त्याच्या किमतीत मोठी वाढ झाली. काही महिन्यांपूर्वी घाऊक बाजारात टोमॅटो अवघ्या 2 ते 3 रुपये किलोने विकला जात होता आणि अनेक शेतकऱ्यांनी ते नाशिकमध्ये रस्त्यावर फेकून दिले. यानंतर मोठ्या प्रमाणात शेतकरी टोमॅटोच्या शेतीपासून दूर राहिले आणि त्याचा परिणाम टॉमेटोच्या उत्पादनावर झाले. यामुळे टॉमेटोची अवाक घडली परिणामी भाव गगनाला भिडले.

सध्या बाजारात सुमारे ३५ ट्रक टोमॅटोची आवक होत आहे. मात्र, मुंबई आणि लगतच्या भागात मागणी पूर्ण करण्यासाठी पुरवठ्याचे प्रमाण अपुरे आहे. टोमॅटोचे दर किलोमागे 150 च्या वर जातील या भीतीने एपीएमसी मार्केटमधील व्यापारी चिंतेत आहेत.हेही वाचा

चेंबूरमध्ये लँडस्लाईड, २५ फूट खोल खड्ड्यात वाहनं कोसळली

मुंबईकरांनो पावसाबाबत IMDची अपडेट जाणून घ्या

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा