Advertisement

मुंबईत आढळले २,८७७ कोरोनाचे नवे रुग्ण

मुंबईत गुरुवारी २ हजार ८७७ नवे रुग्ण आढळून आले असून, ८ जणांचा मृत्यू झाला. तर राज्यातील दैनंदिन कोरोना रुग्णवाढीनं आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे.

मुंबईत आढळले २,८७७ कोरोनाचे नवे रुग्ण
SHARES

मुंबईत गुरुवारी २ हजार ८७७ नवे रुग्ण आढळून आले असून, ८ जणांचा मृत्यू झाला. तर राज्यातील दैनंदिन कोरोना रुग्णवाढीनं आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. राज्यात गुरुवारी २५,८३३ नवीन रुग्ण सापडले. मुंबईतही दिवसभरात २५०० हजारांहून अधिक रुग्णांचं निदान झालं आहे. गतवर्षी सप्टेंबरमध्ये सर्वाधिक २४,८९६ रुग्ण एक दिवसात सापडले होते.

राज्यात गुरुवारी ५८ मृत्यूंची नोंद झाली. राज्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या २३ लाख ९६ हजार ३४० झाली असून, मृतांचा आकडा ५३ हजार १३८ झाला. राज्यातील उपचाराधीन रुग्णांच्या संख्येनेही दीड लाखांचा टप्पा ओलांडला असून, सध्या १ लाख ६६ हजार ३५३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यात दिवसभरात १२,१७४ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, आतापर्यंत २१ लाख ७५ हजार ५६५ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९०.७९ टक्के असून, मृत्यूदर २.२२ टक्के आहे. राज्यात ८,१३,२११ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून, ७,०७९ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

मुंबई महानगर क्षेत्रातील दैनंदिन रुग्णवाढ गुरुवारी पाच हजारांच्याजवळ पोहोचली. मुंबई २८७७, ठाणे शहर ४४३, ठाणे ग्रामीण ३११, नवी मुंबई ३३५, कल्याण-डोंबिवली ५६०, रायगड १२२, पनवेल १८४ इतकी रुग्णवाढ नोंदवण्यात आली आहे.



हेही वाचा -

धारावीत स्वतंत्र लसीकरण केंद्र

१३४ खासगी रुग्णालयांना लसीकरणासाठी मान्यता


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा