Advertisement

23 जानेवारीला मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर दोन तासांचा ब्लॉक

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) तर्फे हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

23 जानेवारीला मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर दोन तासांचा ब्लॉक
SHARES

यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर मंगळवार, 23 जानेवारी रोजी दुपारी दोन तासांचा ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. या एक्स्प्रेस वेवर दुपारी 12 ते 2 वाजेदरम्यान हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) तर्फे हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. साखळी क्र. किमी 24.250 मुंबई वाहिनीवर आणि साखळी क्र. किमी 56.900 पुणे वाहिनीवर (कुसगाव वाडी) महामार्ग वाहतूक व्यवस्थापन प्रणाली अंतर्गत मंगळवारी दुपारी 12 ते 2 दरम्यान हा ब्लॉक घेण्यात येईल. या कामादरम्यान वरील भाग वाहतुकीसाठी बंद करून वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

पुण्याहून मुंबईकडे जाणारी हलकी वाहने मुंबई वाहिनीवरून किमी 55,000 लेनवरून वळतील आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 जुन्या पुणे मुंबई महामार्गावरून मार्गस्थ होतील. पुण्याहून मुंबईकडे जाणारी हलकी वाहने आणि बसेस खोपोली एक्झिट KM 39.800 वरून वळतील आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 जुन्या पुणे मुंबई महामार्गावरून खोपोली शहराकडे जातील आणि नंतर शेडुंग टोल प्लाझा मार्गे मुंबई वाहिनीला जातील.



हेही वाचा

स्वच्छतेमध्ये मध्य रेल्वेचे पनवेल स्टेशन अव्वल

स्थानिकांच्या दबावानंतर सायन पूल काही दिवसांसाठी खुला

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा