Advertisement

गेटवे ऑफ इंडियाजवळ वाहतूक निर्बंध लागू

या तारखेपर्यंत अनेक मार्ग बदलण्यात आले आहेत.

गेटवे ऑफ इंडियाजवळ वाहतूक निर्बंध लागू
SHARES

मुंबई ट्राफिक पोलिसांकडून (Mumbai Traffic Police) गेट वे ऑफ इंडिया (Gateway of India) परिसरात तात्पुरते वाहतूक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अ‍ॅडम स्ट्रीटवरील सुशोभीकरणाच्या कामामुळे हे बदल करण्यात आले असून, ते 20 एप्रिलपासून 29 एप्रिलपर्यंत लागू राहणार आहेत.

या कामाअंतर्गत ग्रॅनाइट दगड बसवण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना अडथळा आणि धोका टाळण्यासाठी दक्षिणेकडे जाणारा (southbound) रस्ता पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे.

वाहतूक निर्बंध

अ‍ॅडम स्ट्रीट आणि छत्रपती शिवाजी महाराज मार्ग (दक्षिणेकडे) येणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहील.

पर्यायी मार्ग

छत्रपती शिवाजी महाराज मार्गावरून (southbound) येणारी वाहतूक अ‍ॅडम स्ट्रीटच्या उत्तर दिशेच्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. यासाठी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत.

सार्वजनिक वाहतूक बदल

  • अ‍ॅडम स्ट्रीटवरील BEST बसस्टॉप क्रमांक 116 हलवून छत्रपती शिवाजी महाराज मार्गावरील यॉट क्लबजवळ करण्यात आला आहे.

  • अ‍ॅडम स्ट्रीटवरील टॅक्सी स्टँडही तात्पुरता महाकवी भूषण मार्गावर हलवण्यात आला आहे.

दरम्यान, शहरातील इतर भागांतही काही तात्पुरते बदल जाहीर करण्यात आले आहेत:

  • कुर्ला (पूर्व) येथील अशोक सम्राट मार्ग सांडपाणी कामासाठी 31 मेपर्यंत बंद

  • घाटकोपर (पूर्व) येथील खोखाणी लेन रस्ते दुरुस्तीसाठी 30 एप्रिलपर्यंत बंद

  • माहिममधील झिनिया हाऊसिंग सोसायटीजवळ 10 जुलैपर्यंत नो-पार्किंग झोन लागू

तसेच अंधेरी (पूर्व) साकीनाका परिसरात MTNL जंक्शन रोड ते मिठी नदीदरम्यान सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम सुरू असून, 18 मार्च ते 31 मेदरम्यान येथे एकमार्गी वाहतूक आणि तात्पुरते बदल लागू करण्यात आले आहेत.

नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.



हेही वाचा

BMC सभांचे लाईव्ह स्ट्रिमिंग होणार">आता BMC सभांचे लाईव्ह स्ट्रिमिंग होणार

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा