Advertisement

टोइंग व्हॅन चालकांवर उपासमारीची वेळ?


टोइंग व्हॅन चालकांवर उपासमारीची वेळ?
SHARES

मुंबई - गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई पोलीस वाहतूक क्षेत्रात कार्यरत असलेल्या टोईंग व्हॅन चालक-मालकांना डावलून गृह विभागाने पुढील कंत्राट मुंबई बाहेरील कंपनीला दिले आहे. त्यामुळे मुंबईत असलेल्या 65 वाहन मालक-चालक आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे पोलिसांनी हे कंत्राट रद्द करावं अशी मागणी करत सोमवारी शिवसेना उपनेते आणि शिव वाहतूक सेनेचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी सर्व वाहनमालक-चालकांसह मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसळगीकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

गेल्या 25 वर्षापासून ही वाहने कंत्राटी तत्वावर कार्यरत आहेत. मात्र, वाहतूक विभागाला अधिक वाहनांची गरज असल्यानं निविदा काढून त्यांनी महिन्याभरापूर्वी मुंबईबाहेरील विदर्भ इन्फोटेक प्रा.लि. या खासगी कंपनीला हे टोईंग वाहन सेवा पुरविण्याचं कंत्राट दिलं आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेउन त्यांना यावर तोडगा काढण्याची विनंती करणार असल्याचं शेख यांनी सांगितले आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा