Advertisement

परळमध्ये जलवाहिनी फुटल्यानं वाहतूककोंडी


परळमध्ये जलवाहिनी फुटल्यानं वाहतूककोंडी
SHARES

परळ-टी. टी. उड्डाणपूल परिसरातील स्लीप रोड इथं ४८ इंची पाण्याची पाइपलाइन फुटली आहे. या पाइपलाइनची दुरूस्ती करण्यासाठी एक मार्गिका बंद ठेवण्यात आल्याने या मार्गावर प्रचंड वाहतूककोंडी झाली आहे.


जलवाहिनी दुरूस्तीच काम

पाइपलाइन फुटण्यामागचं कारण अद्याप समजलेलं नसून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पाइपलाइनच्या दुरुस्तीचं काम हाती घेतलं आहे. या कामासाठी वाहतूक पोलिसांनी परळ-टी.टी. उड्डाणपूलखालील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील वाहतूक बंद करत ही वाहतूक नायगांव क्रॉस रोडमार्गे वळवली आहे.


वाहतूक कशी वळवली?

गुरुवारी सकाळी परळ-टी.टी. उड्डाणपूल परिसरात फुटलेल्या पाण्याच्या पाइपलाइनमुळं परळ-टी.टी. उड्डाणपूलाखालून जाणारी वाहतूक नायगांव क्रॉस रोड मार्गे वळवण्यात आली आहे. तसंच किंग सर्कलहून येणारी वाहतूक माटूंगा बी.ए. रोड मार्गे वळवण्यात आली आहे.



हेही वाचा-

आषाढी यात्रेसाठी मध्य रेल्वेची विशेष गाडी



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा