Advertisement

मेट्रो कामांमुळं मुंबईच्या अनेक रस्त्यांवर प्रचंड वाहतूककोंडी

मुंबईत वाहनांच्या संख्येत इतकी वाढ झाली आहे की, मोठ्या रस्त्यावर आणि गल्लोगल्ली वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत.

मेट्रो कामांमुळं मुंबईच्या अनेक रस्त्यांवर प्रचंड वाहतूककोंडी
SHARES

मुंबईत ठिकठिकाणी मेट्रोचं (mumbai metro) काम सुरू असून, या कामासाठी खोदकाम करण्यात आले आहेत. परिणामी, या कामामुळं मुंबईच्या रस्त्यावर वाहतूक कोंडीची (traffic jam) परिस्तिथी निर्माण होत आहे. मुंबईत वाहनांच्या संख्येत इतकी वाढ झाली आहे की, मोठ्या रस्त्यावर आणि गल्लोगल्ली वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. त्याशिवाय कोरोनाच्या (coronavirus) पार्श्वभूमीवर लोकल बंद असल्याने रस्ते वाहतुकीत पडलेली भर यांमुळे सकाळ-संध्याकाळ कार्यालयीन वेळेत या दोन्ही मार्गांवर प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

लॉकडाऊन (lockdown) टप्प्याटप्प्यानं शिथिल करण्यात येत आहे. मात्र, अद्याप सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नसल्यामुळं रोजगारासाठी घराबाहेर पडणाऱ्या श्रमिकांना बेस्ट बस, रिक्षा, टॅक्सी ही वाहतूक व्यवस्था अपुरी किंवा वेळखाऊ ठरते. परिणामी अनेक अधिकारी, कर्मचारी, कामगार खासगी वाहनांनी प्रवास करत आहेत. रस्त्यांवर खासगी वाहने मोठ्या संख्येने उतरत असल्याने कोंडी वाढली आहे.

या खासगी वाहनांमुळ मुंबईत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची निर्माण होत आहे. मुलुंड ते शीव जोडणाऱ्या लालबहादूर शास्त्री मार्गावर मागील काही महिन्यांपासून मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू आहे. त्यामुळे आधीच अरुंद असलेला एलबीएस आणखी आक्रसला. सकाळी दक्षिणेकडे (सायन, दादरकडे ) जाणारी, तर संध्याकाळी उत्तरेकडे (मुलुंड, ठाण्याकडे) जाणारी वाहतुककोंडी निर्माण होते. विक्रोळीच्या गांधीनगर चौकातून भांडुपच्या सोनापूर चौकात जाण्यासाठी दुचाकीस्वारांना एक ते दीड तास लागतो. प्रत्यक्षात हे अंतर १५ ते २० मिनिटांचे आहे.

मेट्रो प्रकल्पाचे काम करणाऱ्या कंत्राटदारांनी रस्त्याच्या मध्यभागी उभारलेल्या संरक्षक भिंतीमुळं या मार्गावर गेल्या काही महिन्यांत अनेक अपघात घडले आहेत. या मार्गाला येऊन मिळणाऱ्या अन्य रस्त्यांवरून येणारी वाहने किंवा रस्ता ओलांडणारे पादचारी संरक्षक भिंतींच्या उंचीमुळे दृष्टीस पडत नाहीत.

पश्चिम द्रुतगती मार्गावरही तीन ते चार ठिकाणी मेट्रोची कामे सुरू आहेत. या मार्गिकेवरील स्थानकांच्या उभारणीसाठी द्रुतगती मार्गाचा जास्त भाग व्यापण्यात आला आहे. परिणामी येथील मार्ग अरुंद बनला असून सकाळी दहिसरहून वांद्रेकडे आणि संध्याकाळी वांद्रेहून दहिसरकडे येणारी वाहने या ठिकाणी खोळंबतात.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा