Advertisement

रस्ता बंद कराल, तर रस्त्यावर उतरू - दादरकरांचा इशारा


रस्ता बंद कराल, तर रस्त्यावर उतरू - दादरकरांचा इशारा
SHARES

मुंबईचे आराध्य दैवत असलेल्या सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी दर मंगळवारी हजारो भाविक या ठिकाणी येत असतात. त्यामुळे, प्रचंड गर्दी होत असते. ही गर्दी रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी एक मार्गच कायमचा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

दादर पश्चिमेकडील पोर्तुगीज चर्च ते सिद्धिविनायक मंदिर हा एस. के. बोले रोडचा भाग कायमचाच बंद करण्याचा प्रस्ताव दादर वाहतूक पोलिसांनी तयार केला आहे. त्यात रहिवाशांची मते जाणून घेण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवली जात आहे. पण हा मार्ग बंद करण्याला रहिवाशांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. हा मार्ग बंद केल्यास आपण रस्त्यावर उतरुन आंदोलन करू, असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

पण या मुद्द्याचे भांडवल करत आता स्थानिक राजकीय पक्ष स्थानिकांच्या मनात स्थान निर्माण करण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसत आहे. तेथील रहिवाशांच्या अडचणी समजून घेत मनसे आता त्यांच्या पाठिशी उभी राहिली आहे. 21 जुलै रोजी सर्व स्थानिक रहिवाशांच्या वतीने निवेदन करण्याकरता आगर बाजार आणि सिद्धिविनायक मंदिर येथे संध्याकाळी 5 वाजता स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. 

या मोहिमेला नागरिकांसह मंदिरात येणाऱ्या भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे चित्र पहायला मिळाले. ही मोहीम 24 जुलै 2017 रोजी सकाळी 10 ते 12.30 आणि संध्याकाळी 5 ते 8 या वेळेत चालू राहणार आहे.


शेअर टॅक्सीच्या गोंधळामुळे या ठिकाणी गर्दी वाढत आहे. ही मार्गिका बंद झाली तर लोकांना चालता देखील येणार नाही. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी रहिवाशांचा विचार करावा.

नेहा गोलपकर, स्थानिक रहिवासी

याठिकाणी सध्या शेअर टॅक्सी सिद्धिविनायक मंदिराच्या मागील गार्डनच्या बाजूला उभ्या करण्यात येत असून फुटपाथ देखील कमी करण्यात आले आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना चालण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच आता हा मार्गच बंद करण्यात येत असल्यामुळे स्थानिकांची मोठी गैरसोय होणार आहे. त्यामुळे हा मार्ग बंद करण्याला स्थानिकांना विरोध दर्शवला आहे.



हेही वाचा -

अपघात नियंत्रणासाठी स्वाक्षरी मोहीम


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा