Advertisement

मुंबईतील आणखी १७४१ झाडांवर कुऱ्हाड!

मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणानं झाडं मुळांसकट काढून त्यांचं पुनर्रोपन करणे आणि झाडांच्या फांद्यांची छाटणी करणे इ. अशा विविध कामांसाठी नोटीसा काढल्या आहे. या नोटीशीनुसार लवकरच १७४१ झाडांवर कुऱ्हाड कोसळणार असल्याची माहिती झाडं वाचवण्यासाठी न्यायालयात लढणाऱ्या झोरू बाथेना यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली.

मुंबईतील आणखी १७४१ झाडांवर कुऱ्हाड!
SHARES

विकासाच्या नावाखाली गेल्या कित्येक वर्षांपासून मुंबईतील झाडांचा बळी घेतला जात असून हा प्रकार काही संपताना दिसत नाही. कारण लवकरच मुंबईतील १७४१ झाडांवर कुऱ्हाड पडणार आहे. मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणानं झाडं मुळांसकट काढून त्यांचं पुनर्रोपन करणे आणि झाडांच्या फांद्यांची छाटणी करणे इ. अशा विविध कामांसाठी नोटीसा काढल्या आहे. या नोटीशीनुसार लवकरच १७४१ झाडांवर कुऱ्हाड कोसळणार असल्याची माहिती झाडं वाचवण्यासाठी न्यायालयात लढणाऱ्या झोरू बाथेना यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली.


'अशी' तोडली जातात झाडे

मेट्रो, मोनो, उड्डाणपूल, रस्ते, गटार आणि इतर प्रकल्पांसाठी झाडांची छाटणी करणं किंवा मुळापासून झाडं काढून इतरत्र पुनर्रोपित करण्यासाठी वृक्ष प्राधिकरणाची परवानगी बंधनकारक असते. त्यानुसार वृक्ष प्राधिकरण ही परवानगी देण्यासाठी नोटीसा बजावत सूचना-हरकती मागवते. त्याप्रमाणं जानेवारी २०१८ ते १७ जून २०१८ पर्यंत एकूण १७४१ झाडांसाठी अशा नोटीसा बजावल्याचं बाथेना यांनी सांगितलं.

नोटीसा जारी केल्यानंतर सूचना-हरकती लक्षात घेत झाडांची छाटणी केली जाते. त्यानुसार जानेवारी ते जूनदरम्यान या नोटीसा काढण्यात आल्या असल्या तरी यातील एकाही झाडांवर अद्याप कुऱ्हाड कोसळलेली नाही.


स्थगिती उठली

कारण बाथेना यांच्याच झाडांच्या कत्तलीसंदर्भातील एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयानं मंबईतील झाडांवर कुऱ्हाड चालवण्याच्या कामाला स्थगिती दिली होती. त्यामुळं नोटीसा काढल्या तरी प्रत्यक्षात झाडांवर कुऱ्हाड चालवण्यात आलेली नाही. पण एप्रिलमध्ये न्यायालयानं ही स्थगिती उठवली आहे.


लवकरच कुऱ्हाड

त्यामुळं आता वृक्ष प्राधिकरणानं विकास कामांसाठी झाडांवर कुऱ्हाड चालवण्यासाठी आवश्यक ती परवानगी देण्यासाठी नोटीसा जारी करण्यास सुरूवात केली आहे. त्याअनुषंगानं आता लवकरच १७४१ झाडांवर कुऱ्हाड चालवली जाणार असल्याचं बाथेना यांनी स्पष्ट केलं.


नवा ट्रेण्ड घातक

विकासकामांना आमचा विरोध नाही, पण झाडांचा बळी न घेता विकास कसा होईल याचा थोडाही विचार प्रकल्प राबवणाऱ्या यंत्रणांकडून होत नाही. त्यातच झाडाचं पुनर्रोपन केलं जातं. पण त्यानंतर ते झाडं जगलं की वाचलय याकडं ढुंकूनही संबंधित यंत्रणेकडून पाहिलं जात नाही, असं म्हणत वनशक्तीचे प्रकल्प संचालक स्टॅलिन दयानंद यांनीही यावर नाराजी व्यक्त केली.

१०० ते १५० वर्षे जुनी झाडं कापून, पर्यावरण धोक्यात आणून त्या जागी बाॅटल प्लाम्ससारखी शोभेची झाडं लावण्याचा नवा ट्रेण्ड महापालिकेनं सुरू केल्याच म्हणत स्टॅलिन यांनी महापालिकेच्या या धोरणावरही टीका केली आहे.



हेही वाचा-

पर्यावरणप्रेमींचा दणका, दादरमधील झाडांच्या छाटणीचं काम बंद

पर्यावरण दिन विशेष: मुंबईतल्या तरुणांनी केलं झाडांना वेदनामुक्त



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा