चर्चगेट स्थानकाबाहेर झाड कोसळल्याने 4 गाड्यांचे नुकसान

  Churchgate
  चर्चगेट स्थानकाबाहेर झाड कोसळल्याने 4 गाड्यांचे नुकसान
  मुंबई  -  

  चर्चगेट स्टेशनच्या फलाट क्रमांक चारच्या बाहेर असलेले एक जुने वडाचे झाड कोसळल्याची घटना गुरुवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत 3 खासगी गाड्या आणि तेथून जाणाऱ्या एका टॅक्सीचे नुकसान झाले आहे. ही टॅक्सी चर्चगेट येथून कामा रुग्णालयाकडे जात होती. तेव्हा जीएसटी भवन येथील पद्मभूषण डॉ. शांतीलाल शेठ चौक येथे येताच एक जुने वडाचे झाड त्या टॅक्सीवर कोसळले.

  त्यावेळी टॅक्सीत दोन महिला प्रवास करत होत्या. सुदैवाने टॅक्सीचालक आणि प्रवासी महिला वेळीच बाहेर निघाल्याने तिघेही बचावले. याचसोबत तिथे उभ्या असलेल्या 3 खासगी गाड्यांचे देखील नुकसान झाले आहे. झाड रस्त्याच्या मध्यभागी कोसळल्यामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. 20 मिनिटांनंतर वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आली. त्यामुळे या परिसरात वाहतूक कोंडीही निर्माण झाली होती.


  टॅक्सीवर झाड पडताच आम्ही तत्काळ बाहेर पडलो. अन्यथा मोठा अनर्थ झाला असता, सुदैवाने आम्ही बचवलो
  - मुन्ना शेख, टॅक्सी चालक  हेही वाचा - 

  चेंबूरमध्ये झाड कोसळून घराचे नुकसान


  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.