मुंबईतील सर्वात मोठा खड्डा...


  • मुंबईतील सर्वात मोठा खड्डा...
SHARE

माहीम - माहीम-धारावीला जोडणारा ब्रीज खचलाय. त्यामुळे या ब्रीजचा अर्धाच भाग वाहतुकीसाठी सुरू आहे. त्यामुळे ब्रीजजवळ मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक होते. जवळपास आठ वर्षे उलटली तरी या ब्रीजची दुरुस्ती झालेली नाही. कारणं काहीही असोत, पण सेना-भाजपाचीच सत्ता असलेल्या, पालिकेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळं म्हणा किंवा बेफिकीरीमुळं, इथल्या ट्रॅफिक व्यवस्थेचे पार तीन-तेरा वाजले आहेत.

मेट्रो, मोनो, भुयारी मार्ग, सागरी महामार्ग यासारख्या प्रकल्पांच्या घोषणांनी मीडियात हवा केली असताना, बिझनेस हब असलेल्या बीकेसीमध्ये नेणाऱ्या या रस्त्याची अवस्था, मुंबईच्या खऱ्या वाहतूक व्यवस्थेचंच दर्शन घडवतेय. तेव्हा प्रशासन आणि राजकारण्यांनो, लक्षात ठेवा. मुंबईकर बघतोय तुमच्याकडं.

 

संबंधित विषय
ताज्या बातम्या