Advertisement

कांद्यानंतर आता तूरडाळ रडवणार

याआधीही तूरडाळीच्या किंमतीने कळस गाठला होता. त्यावेळी सामान्य माणसाच्या नाकीनऊ आले होते. कांद्याचे दर वाढलेले असतानाच तूरडाळीच्या किंमती अशाच वाढत राहिल्या तर त्यावर नियंत्रण आणण्यासाठी सरकारला प्रयत्न करावे लागणार आहेत.

कांद्यानंतर आता तूरडाळ रडवणार
SHARES

कांद्यानं सर्वसामान्यांना रडवल्यानंतर आता तूर डाळीचे भाव देखील वाढले आहेत. तूर डाळीचे भाव ९८ रुपये प्रतिकिलो झालेत. सरकारनं तूरडाळीसाठी ४ लाख टन कोटा ठरवला आहे. व्यापाऱ्यांनी आतापर्यंत २.१५ लाख टन तूर डाळ आयात केली आहे. या स्थितीत सरकार यासाठीची डेडलाइन ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्याची तयारी करत आहे. 

का वाढणार दर?

तूर डाळीच्या आयातीचा कोटा पूर्ण न झाल्यानं डाळीचे भाव वाढण्याची अपेक्षा आहे. सरकारनं लाख टन तूर आयातीचा कोटा नक्की केला होता. हा कोटा पूर्ण झाला नसल्यानं तूर डाळ महागणार आहे

डेडलाइन वाढवण्याची मागणी

परदेशातून खरेदी केलेली तूर डाळ ऑक्टोबर महिन्यात भारतात आणण्याचे निर्देश सरकारनं दिले होते. पण आता ही डेडलाइन १५ नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आलेत. व्यापाऱ्यांनी ही तारीख ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्याची मागणी केली होती.

सामान्यांच्या खिशाला कात्री

याआधीही तूर डाळीच्या किंमतीने कळस गाठला होता. त्यावेळी सामान्य माणसाच्या नाकीनऊ आले होते. कांद्याचे दर वाढलेले असतानाच तूरडाळीच्या किंमती अशाच वाढत राहिल्या तर त्यावर नियंत्रण आणण्यासाठी सरकारला प्रयत्न करावे लागणार आहेत.हेही वाचा

कांद्याचे दर लवकरच १५० रुपये किलो

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा