Advertisement

नवोदित अभिनेता राहुल दिक्षीतची आत्महत्या

मुंबईच्या ओशिवरा परिसरात राहणाऱ्या राहुल दिक्षीत या नवोदित कलाकाराने राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली. या प्रकरणी ओशिवरा पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नवोदित अभिनेता राहुल दिक्षीतची आत्महत्या
SHARES

मुंबईच्या ओशिवरा परिसरात राहणाऱ्या राहुल दिक्षीत या नवोदित कलाकाराने राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली. या प्रकरणी ओशिवरा पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


घरी पार्टीचं आयोजन

ओशिवराच्या यमुना नगर डी विंगमध्ये राहुल हा पत्नी रुपाली सोबत रहात होत. रुपाली ही गायक असून छोटी मोठी कामे करून हे दोघे स्वत:चा उदरनिर्वाह करत होते. मंगळवारी रात्री राहुलने आपल्या घरी पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीला त्याचा एक मित्र आणि दोन मैत्रिणी आल्या होत्या. रात्री उशिरपर्यंत हे सर्व पार्टी करत होते. दरम्यान पार्टी सुरू असतानाच बराच वेळ झाला तरी राहुल दिसत नसल्यानं काळजीनं रूपालीनं त्याला घरात शोधण्यास सुरूवात केली. जेव्हा तिने बेडरूमचा दरवाजा उघडला तेव्हा राहुलनं फासावर लटकलेला दिसला. घाबरलेल्या रूपालीनं त्वरीत पोलिसांना याबाबतच कळवलं. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहचत राहुलचा मृतदेह ताब्यात घेत कुपर रूग्णालयात पाठवला आहे. तर याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.


आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट

दरम्यान, पहाटे ४ च्या सुमारास राहुलनं आत्महत्या केली असून त्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. त्यातच घटनास्थळी सुसाईड नोटही न आढळल्यानं राहुल आत्महत्येचं गुढ आता आणखी वाढलं आहे.हेही वाचा -

पंधरा वर्षांपासून गुंगारा देणारा आरोपी अखेर अटकेत

टी-२० वर्ल्ड कपच वेळापत्रक जाहीर, पण भारत, पाकिस्तान संघ वेगवेगळ्या गटातRead this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा