Advertisement

हे काय? एनसीबीच्या आॅफिससमोर पत्रकारच एकमेकांना भिडले

अंमलीपदार्थ विरोधी पथका (NCB)च्या कार्यालयासमोरच काही पत्रकार एकमेकांना भिडल्याचा प्रकार घडला. सुदैवाने उपस्थित पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत हा वाद शमवला.

हे काय? एनसीबीच्या आॅफिससमोर पत्रकारच एकमेकांना भिडले
SHARES

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण, ड्रग्ज कनेक्शन तसंच इतर वादग्रस्त कारणांवरून सध्या एकेकाळी निष्पक्ष वार्तांकनाचा दावा करणाऱ्या पत्रकारांमध्येही गट तट निर्माण झाले आहेत. यातूनच अंमलीपदार्थ विरोधी पथका (NCB)च्या कार्यालयासमोरच काही पत्रकार एकमेकांना भिडल्याचा प्रकार घडला. सुदैवाने उपस्थित पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत हा वाद शमवला. (tv journalist fighting in front of ncb office mumbai)

हेही वाचा - ड्रग्ज रॅकेटप्रकरणी कंगनाची चौकशी का नाही?- सचिन सावंत

बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शनची सध्या एनसीबीकडून चौकशी सुरू आहे. त्यामुळे या चौकशीचं वार्तांकन करण्यासाठी एनसीबीच्या कार्यालयासमोर मुंबईतील पत्रकारांसोबतच मुंबईबाहेरून आलेल्या पत्रकारांची मोठी गर्दी असते. गुरूवारी नेहमीप्रमाणे कामकाज सुरू असताना वार्तांकनासाठी एका जागेवर उभं राहण्यावरून दोन पत्रकारांमध्ये वाद झाला. त्यानंतर एका चॅनेलचा पत्रकार आरडाओरडा करून बातमी देत असल्याने इतरांना काम करण्यात अडथळा येत होता. त्यामुळे इतर पत्रकारांनी या पत्रकाराला समजावण्याचा प्रयत्न केला.  

तेव्हा या पत्रकाराने कुणाचंही ऐकूण न घेता मुंबईतील पत्रकारांना चाय बिस्कुट खाणारे गरीब पत्रकार अशा शब्दांत हिणावलं. त्यामुळे मुंबईतले पत्रकार संतापले आणि दिल्लीहून आलेल्या त्या न्यूज चॅनेलच्या पत्रकाराला जाब विचारला. परंतु त्याने आरडाओरड करण्यास सुरूवात केली असता, त्याच्यात आणि इतर पत्रकारांमध्ये धक्काबुक्की झाली. त्यावेळी उपस्थित मुंबई पोलिसांनी हस्तक्षेप करत हा वाद सोडवला. सध्या या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियातून चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा - कंगना म्हणते, उर्मिला मातोंडकर सॉफ्ट पॉर्न स्टार

Read this story in हिंदी
संबंधित विषय