Advertisement

भारतीय विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी एअर इंडियाची विमानं युक्रेनला पाठवणार

गुरुवारी रात्री भारतीय विद्यार्थी मेट्रो स्टेशन, वसतिगृहातील बंकर आणि त्यांच्या फ्लॅटमध्ये लपून होते.

भारतीय विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी एअर इंडियाची विमानं युक्रेनला पाठवणार
SHARES

रशियानं युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर वेगवेगळ्या शहरांमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी एअर इंडियाची दोन विमानं शुक्रवारी रात्री रवाना होणार आहेत. त्याचा खर्च भारत सरकार उचलणार आहे. ती बुखारेस्ट, रोमानिया मार्गे भारतीयांना परत आणेल.

गुरुवारी रात्री भारतीय विद्यार्थी मेट्रो स्टेशन, वसतिगृहातील बंकर आणि त्यांच्या फ्लॅटमध्ये लपून होते. तिथं सुरक्षा तैनात असलेले मार्शल त्यांच्या मोबाईलमधून युक्रेनवरील हल्ल्याशी संबंधित फोटो आणि व्हिडिओ हटवत होते.

बंकरमध्ये लपलेले विद्यार्थीही हनुमान चालिसाचे पठण करताना दिसले. भारतीय दूतावासानं ऑनलाइन वर्ग घेण्याची मागणी मान्य केली असती तर ते फसले नसते, असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे.

युक्रेनच्या सर्वाधिक नुकसान झालेल्या रशियाच्या सीमेवर असलेल्या खार्किवमध्ये बोधगया भागातील अनेक विद्यार्थी अडकले आहेत. पुढील ३-४ दिवसांचे खाद्यपदार्थ जमा झाले आहे. वसतिगृहात पोहोचलेल्या काही विद्यार्थ्यांना कसेबसे जेवण मिळत आहे.

काही विद्यार्थ्यांना बंकरमध्ये जीव वाचवण्यासाठी भाग पाडलं जातंय. त्यांना खाण्यापिण्यात अडचणी येत आहेत. शहराची अवस्था अशी आहे की पिण्याच्या पाण्यासाठी लांबच लांब रांगा लावाव्या लागतात.



हेही वाचा

Russia-Ukraine Crisis: भारत सरकारकडून विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन नंबर जाहीर

रशिया-युक्रेन वादाच भारतावर काय होईल परिणाम?

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा