Advertisement

खड्ड्याने घेतला चिमुकल्यासहीत अाईचा बळी


खड्ड्याने घेतला चिमुकल्यासहीत अाईचा बळी
SHARES

पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अनेकांचा बळी जात असतो. मात्र, पावसाळ्यानंतरही खड्ड्यांमुळे नागरिकांचा मृत्यू होण्याच्या घटना थांबलेल्या नाहीत. घाटकोपर - मानखुर्द लिंक रोडवरून जात असताना मध्येच अालेल्या खड्ड्याने बाईकस्वार प्रमोद घडशी यांचे संतुलन बिघडले. त्यामुळे बाईकवरील त्यांची पत्नी पूजा (२९) अाणि ११ महिन्यांचा मुलगा मंथन खाली पडला. याचवेळी पाठीमागून वेगाने अालेल्या डंपरने या मायलेकाला चिरडलं. रविवारी घडलेल्या या हदयद्रावक घटनेत या मायलेकाचा जागीच मृत्यू झाला.


महापालिका जबाबदार

दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या डंपर चालकाला पोलिसांनी अटक केली अाहे. या घटनेसाठी मृताच्या कुटुंबियांनी मुंबई महापालिकेला जबाबदार धरलं अाहे. पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी न्यायालयाने अनेक वेळा मुंबई महापालिका अाणि इतर संबंधीत प्रशासनाला फटकारलं अाहे. मात्र, त्यानंतर खड्डे नीट भरले न गेल्याने बळींचा अाकडा वाढतच अाहे.



हेही वाचा - 

तळोजा एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट; १४ गावांना हादरे

८० काेटींचा जीएसटी बुडवला, पुण्यातल्या व्यापाऱ्याला मुंबईत अटक

नोकरीचं आमिष दाखवून १२ महिलांना परदेशात वेश्या व्यवसायात ढकललं




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा