Advertisement

'मुंबई लाइव्ह'च्या बातमीची दखल, उमरखाडी क्रॉसलेनचा रस्ता झाला दुरुस्त


'मुंबई लाइव्ह'च्या बातमीची दखल, उमरखाडी क्रॉसलेनचा रस्ता झाला दुरुस्त
SHARES

अनेकदा पालिकेकडे तक्रार करूनही दक्षिण मुंबईच्या उमरखाडी क्रॉसलेन परिसरातील रस्त्याची दुरुस्ती होत नव्हती. पण यासंदर्भात मुंबई लाइव्हने दाखवलेल्या बातमीनंतर आज कामाला सुरुवात झाली असल्याचे 'सब की सेवा' अॅडव्हान्स लोकॅलिटी मॅनेजमेंटचे(एएलएम) अध्यक्ष रिझवी झाहीद हुसेन यांनी म्हटले आहे.

उमरखाडी क्रॉसलेन या रस्त्याची चाळण झाल्याने त्याच्या दुरुस्तीसाठी अनेकवेळा 'बी' वॉर्डच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. पण त्याचा काहीच उपयोग होत नव्हता. अखेर ही समस्या 'मुंबई लाइव्ह'कडे मांडली. 'मुंबई लाइव्ह'ने दिलेली बातमी पालिका अधिकारी मंडळाला दाखवल्यानंतर त्यांनी पुढाकार घेतला आणि लगेच यंत्रणा कामाला लागली, असे रिझवी हुसेन यांनी सांगितले. आज उमरखाडी क्रॉसलेनचा रस्ता दुरुस्त झाला आहे. त्यामुळे त्यांनी 'मुंबई लाइव्ह'चे आभार देखील मानले.

चांगल्या उद्देशान जो कोणी आमच्याकडे येईल, त्याला जरूर सहकार्य करू, असे आश्वासन बी वॉर्डचे सहाय्यक आयुक्त उदयकुमार शिरुरकर यांनी दिले. पण विभागातील काही मंडळी अधिकारी वर्गाला काम करण्यास अडथळा आणतात. त्यांच्यामुळेच विभागात काम करणे सोयीचे होत नसते. पण 'मुंबई लाइव्ह' जे हिताचे प्रश्न मांडेल ते सर्व मार्गी लावण्याचा पूर्ण प्रयत्न करणार, असे आश्वासन शिरुरकर यांनी दिले.


हे देखील वाचा 

- पालिकेच्या 'बी' वॉर्डमध्ये आणखी एका एएलएमची स्थापना


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा