Advertisement

बरोजगारीनं गाठला अडीच वर्षातील उच्चांकी दर

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारला धक्का देणारी एक माहिती समोर आली आहे. बेरोजगारीवरून विरोधक केंद्र सरकारवर हल्लाबोल करत असतानाच देशात बेरोजगारीच्या दरानं अडीच वर्षांचा उच्चांक गाठला असल्याचं समोर आलं आहे.

बरोजगारीनं गाठला अडीच वर्षातील उच्चांकी दर
SHARES

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारला धक्का देणारी एक माहिती समोर आली आहे. बेरोजगारीवरून विरोधक केंद्र सरकारवर हल्लाबोल करत असतानाच देशात बेरोजगारीच्या दरानं अडीच वर्षांचा उच्चांक गाठला असल्याचं समोर आलं आहे.

दर ८.१ टक्क्यांवर

देशात एप्रिल महिन्याच्या तीन आठवड्यात बेरोजगारीचा दर ७.९ टक्क्यांवरून ८.१ टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या दोन वर्षांमधील बरोजगारीनं गाठलेला हा उच्चांक आहे. सीएमआयई (सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी)ने ही आकडेवारी प्रसिद्ध केली असून त्यातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

कोट्यवधींनी नोकऱ्या गमावल्या

नोटाबंदी आणि जीएसटी लागू करण्यात आल्यामुळे देशभरातील ४ ते ५ कोटी लोकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्याची माहिती असलेला अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला होता. त्यानंतर विरोधकांनीही सरकारला धारेवर धरलं होतं. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या निवडणुकीदरम्यान वर्षाला २ कोटी लोकांना रोजगार देणार असल्याची घोषणा केली होती. परंतु आता समोर आलेल्या माहितीनुसार बरोजगारीचाच दर वाढला असल्याचंच दिसून येत आहे.

हेही वाचा -

एअर इंडियाच 'सीटा' सर्व्हर तब्बल ५ तासांनंतर सुरू

२० रूपयाची नवी नोट लवकरच चलनात

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा