Advertisement

एअर इंडियाच 'सीटा' सर्व्हर तब्बल ५ तासांनंतर सुरू

एअर इंडिया या सरकारी विमान कंपनीच्या विमानांची तांत्रीक बाब सांभाळणारा ‘सीटा’ सर्व्हर डाऊन झाल्यानं देशभरात एअर इंडियाची विमान ठप्प झाली होती. पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास सर्व्हर बंद पडल्यानं याचा फटका शेकडो प्रवाशांना बसला. त्यांचा चांगलाच खोळंबा झाला होता.

एअर इंडियाच 'सीटा' सर्व्हर तब्बल ५ तासांनंतर सुरू
SHARES

एअर इंडिया या सरकारी विमान कंपनीच्या विमानांची तांत्रीक बाब सांभाळणारा ‘सीटा’ सर्व्हर डाऊन झाल्यानं देशभरात एअर इंडियाची विमान ठप्प झाली होतीपहाटे ३.३० वाजताच्या सुमारास सर्व्हर डाऊन झाल्यानं याचा फटका शेकडो प्रवाशांना बसलात्यांचा चांगलाच खोळंबा झाला होतामात्रतब्बल ५ तासांनंतर सर्व्हर सुरू झाल्यानं विमानतळावर अडकून राहिलेल्या प्रवाशांनी अखेर सुटकेचा निश्वास सोडला.


सीटा सर्व्हर बंद

'सीटा' सर्व्हर हे एअर इंडियाच्या आयटी आणि कम्युनिकेशन विभागाची अत्याधुनिक यंत्रणा आहे. सर्व्हर डाऊन झाल्यामुळं प्रवाशांना चेक इन करता येत नव्हतं, त्याचबरोबर इतरही तांत्रिक बाबी पूर्ण होण्यास अडचणी येत होत्या. यामुळं एअर इंडियाच्या दिल्ली आणि मुंबई विमानतळांसह जगभरातील प्रवाशांना या अडचणीला तोंड द्यावं लागत होतं. याबाबत कोणतीही माहिती मिळत नसल्यानं प्रवाशांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं होतं.


विमानसेवा विस्कळीत

सीटा सर्व्हर डाऊन झाल्याची माहिती मिळताच एअर इंडियाचे अभियंते दुरूस्तीचं काम करत होतेमात्रसर्व्हर सुरळीत झालं असले तरी विमानसेवा मात्र अजूनही विस्कळीत असल्याचे समजते आहे.



हेही वाचा -

बघा तो व्हिडिओ... 'खोटं बोल पण, रेटून बोल म्हणजे राज ठाकरे' - आशिष शेलार

कालिदास कोळंबकर पंतप्रधानांच्या रॅलीत


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा