Advertisement

मोबाइल तिकीट अ‍ॅप सुविधा लवकरच


मोबाइल तिकीट अ‍ॅप सुविधा लवकरच
(Representational Image)
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या लोकल प्रवास आता सुरू झाला. कोरोना प्रतिबंधक लसीचे २ डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. कोरोनामुळं तिकिट सुविधा बंद होती. ही सुविधा सुरू झाली असून, रेल्वे प्रशासन आता लवकरच मोबाइल तिकीट अ‍ॅप सुविधाही सुरू करण्याच्या विचारात असल्याची माहिती समोर येत आहे.

राज्य सरकारनं आखून दिलेल्या नियमावलीनुसार २ लसमात्रा घेतलेल्या प्रवाशांनाच लोकल प्रवासाची मुभा आहे. त्यांच्यासाठी तिकीट व पास सुविधा तिकीट खिडक्यांवर उपलब्ध आहे. परंतु खिडक्यांसमोरील गर्दी कमी करण्यासाठी मोबाइल तिकीट सुविधाही लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

यामध्ये मोबाइल तिकीट अ‍ॅप युनिव्हर्सल ट्रॅव्हल पासशी जोडून ही सुविधा प्रवाशांसाठी सुरू केली जाईल. त्यामुळं दोन लसमात्रा घेतलेल्या प्रवाशांना तिकीट व पास मिळेल. ही सेवाही येत्या दोन आठवडय़ात सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचं समजतं.

एसी लोकल सेवा

मुंबई लोकलनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गारेगार व आरामदायी प्रवास करता यावा यासाठी रेल्वे प्रशासनानं एसी लोकलची सेवा सुरू केली आहे. मध्य व पश्चिम रेल्वे या दोन्ही मार्गावर एसी लोकल सुरू करण्यात आली आहे. मात्र, या लोकलचं तिकीट सर्वसामान्य प्रवाशांना परवडणारे नसल्यानं त्या लोकलला प्रवाशांचा प्रतिसाद फार कमी मिळत आहे. त्यामुळं सर्वसामान्यांनाही एसी लोकलमधून प्रवास करता यावा यासाठी आता पश्चिम रेल्वे प्रशासनानं नवीन योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

पश्चिम रेल्वेच्या योजनेनुसार, सामान्य लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रथम श्रेणी व द्वितीय श्रेणीच्या प्रवाशांनाही एसी लोकलमधून प्रवास करता यावा, यासाठी एक वेगळा प्रयोग करण्यात येणार आहे. प्लॅटफॉर्मवर सामान्य लोकलची प्रतीक्षा करणारे प्रवासी एसी लोकलमधूनही प्रवास करू शकणार आहेत. त्यासाठी सामान्य लोकलचे तिकीट व वातानुकूलित लोकलच्या भाडेदरातील फरक डब्यात उपस्थित तिकीट तपासनीसाकडे भरून प्रवासाची मुभा मिळणार आहे.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा