Advertisement

Vande Bharat Express 'या' मार्गांवर धावणार, इतर एक्स्प्रेसपेक्षा तिकिटाचे दर अव्वाच्या सव्वा

वंदे भारत एक्सप्रेसचे तिकीटदर समोर आले असून आतापर्यतचे हे सर्वाधिक दर असल्याचे बोलले जात आहे. जाणून घ्या याचे तिकिट दर

Vande Bharat Express 'या' मार्गांवर धावणार, इतर एक्स्प्रेसपेक्षा तिकिटाचे दर अव्वाच्या सव्वा
SHARES

वंदे भारत एक्स्प्रेसचा (Vande Bharat Express) प्रवास काहीसा खिशाला फटका देणारा ठरू शकतो. (Vande Bharat express ticket rates)

नाशिकमार्गे जाणाऱ्या मुंबई-शिर्डी (Mumbai Shirdi) आणि पुणेमार्गे जाणाऱ्या मुंबई- सोलापूर (Mumbai -Solapur ) ‘वंदे भारत एक्स्प्रेस’चे तिकीट दर अपेक्षेहून जास्त असल्याची माहिती समोर आली आहे. सर्वात महत्त्वाचे या तिकिटाच्या किमतीत खाद्यपदार्थांचाही समावेश नाही. (Vande Bharat express ticket rates)

पंतप्रधान नरेंद्र मोदी या वंदे भारत एक्स्प्रेसच्या तीन नव्या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार आहे. यातून प्रवास करण्यासाठी तुम्हाला चेअर कारमध्ये पुण्यापर्यंतच्या प्रवासासाठी 560 रुपये तर, सोलापूरपर्यंतच्या प्रवासासाठी 965 रुपयांचं तिकीट काढावं लागणार आहे.

Vande Bharat express नं प्रवासादरम्यान मुंबई ते शिर्डी हे अंतर ओलांडण्यासाठी 5 तास 20 मिनिटं इतका वेळ लागत असल्याची माहिती देण्यात आली आहे. तुलनेनं मुंबई ते सोलापूर अंतरासाठी प्रवाशांचे 6 तास 30 मिनिट खर्च होणार आहेत.

  • मुंबई ते पुणे चेअर कारसाठी 560 रुपये तर एक्झिक्यूटिव्ह कोर्टसाठी 1135 रुपये
  • मुंबई ते सोलापूर चेअर कारसाठी 965 रुपये तर एक्झिक्यूटिव्ह कोर्टसाठी 1970 रुपये
  • मुंबई ते नाशिकसाठी चेअर कार 550 रुपये तर एक्झिक्यूटिव्ह कोर्टसाठी 1150 रुपये
  • मुंबई ते शिर्डी चेअर कार 800 रुपये तर एक्झिक्यूटिव्ह कोर्ट साठी 1630 रुपये

तर वंदे भारत एक्सप्रेस दादर, ठाणे आणि नाशिकरोड येथे थांबेल. इगतपुरी ते पुणतांबा दरम्यान ही ट्रेन ताशी 110 किमी वेगाने धावेल.

वंदे भारत एक्सप्रेसचे तिकीटदर समोर आले असून आतापर्यतचे हे सर्वाधिक दर असल्याचे बोलले जात आहे. या गाडीची चाचणी करण्यात आली तर दुसरी वंदे भारत ही 7 ते 8 फेब्रुवारीच्या दरम्यानमध्ये रेल्वेच्या ताफ्यात दाखल होणार आहे. दुसरीकडे मुंबईहून नाशिकला (Nashik) येणाऱ्या वंदे भारत प्रवाशांसाठी महागडी ठरणार आहे.

'या' मार्गावरील इतर एक्स्प्रेसचे दर

मुंबई-पुणे डेक्कन क्वीन

चेअर कार - 385 रुपये

व्हिस्टाडोम - 995 रुपये

दादर-साईनगर शिर्डी एक्स्प्रेस

स्लीपर - 270 रुपये

तृतीय वातानुकूलित (Third AC) - 730 रुपये

द्वितीय वातानुकूलित -1035 रुपये

सीएसएमटी-सोलापूर सिद्धेश्वर एक्स्प्रेस

शयनयान - 305 रुपये

तृतीय इकॉनॉमी - 665 रुपये

तृतीय वातानुकूलित - 720 रुपये

द्वितीय वातानुकूलित - 1000 रुपये

प्रथम वातानुकूलित - 1675 रुपये



हेही वाचा

नवी मुंबई-गेटवे ऑफ इंडिया वॉटर टॅक्सी ७ फेब्रुवारीपासून सुरू, पहा तिकिटाचे दर आणि वेळापत्रक

10 फेब्रुवारीला पंतप्रधानांच्या हस्ते दिघा स्थानकाचे उद्घाटन होण्याची शक्यता

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा