Advertisement

वसईच्या किनाऱ्यावर मृतावस्थेत आढळला ३५ फूट लांबीचा व्हेल मासा

बालीन व्हेलच्या सुमारे १६ प्रजाती आहेत, ज्याला व्हेलबोन व्हेल देखील म्हणतात.

वसईच्या किनाऱ्यावर मृतावस्थेत आढळला ३५ फूट लांबीचा व्हेल मासा
SHARES

वसईच्या सुरुची बाग किनाऱ्याजवळ असलेल्या बेनापट्टी किनाऱ्यावर व्हेल मासा मृतावस्थेत आढळून आला आहे. ३५ फूट लांब आणि १२ फूट रुंद असा हा व्हेल मासाचा आकार आहे. मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली.

वसईच्या किनाऱ्यावर एवढ्या मोठ्या आकाराचा व्हेल मासा आढळून आल्याची ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे वसईतील नागरिकांनी त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

https://www.facebook.com/MumbaiLiveMarathi/videos/264340782219046/

वसई पोलिसांना याबद्दल माहिती मिळताच त्यांनी तात्काळ वनविभाग आणि वसई विरार महानगरपालिकेला कळवलं. 

व्हेल मासा मृत अवस्थेत आढळल्यानंतर तीनही प्रशासनातर्फे या माशाचा पंचनामा करण्यात आला आहे. त्याच्या शरीरावर जखमा असल्याचं दिसून आलं आहे. तसंच बुधवारी या माशाला महापालिकेच्या साहाय्यानं किनाऱ्यावरच पुरण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, या व्हेल माशाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबतची नेमकी माहिती अद्याप समोर आलेली नाही.  मृत माशाच्या पेशी तपासणीसाठी पाठवण्यात आल्या आहेत. तपासानंतरच या माशाच्या मृत्यूचं कारण स्पष्ट होऊ शकणार आहे.

बालीन व्हेलच्या सुमारे १६ प्रजाती आहेत, ज्याला व्हेलबोन व्हेल देखील म्हणतात. यापूर्वी पालघर जिल्ह्यात व्हेल आणि शार्कचे मृतदेह किनाऱ्यावर वाहून आले होते. जुलै 2019 मध्ये पालघरच्या समुद्रकिनाऱ्यावर ४० फूट व्हेलचे अत्यंत कुजलेले मृतदेह वाहून आले होते.


हेही वाचा

४८ तास धोक्याचे, मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

यंदा गणेशोत्सवात ध्वनी प्रदूषणाची पातळी अत्यंत कमी

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा