Advertisement

maharashtra budget 2021: पेट्रोल-डिझेलवरील शुल्कमाफीची अपेक्षा फोल, दारूही महागणार

अर्थमंत्री पेट्रोल-डिझेलवरील शुल्क कपात करून जनतेला दिलासा देतील ही अपेक्षा फोल ठरली. तर दुसऱ्या बाजूला अर्थमंत्र्यांनी देशी बनावटीच्या ब्रँडेड आणि नॉन ब्रँडेड मद्यावरील व्हॅटमध्ये ५ टक्क्यांची वाढ केल्याने दारू महागणार आहे.

maharashtra budget 2021: पेट्रोल-डिझेलवरील शुल्कमाफीची अपेक्षा फोल, दारूही महागणार
SHARES

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी सोमवारी राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2021) सादर केला. यावेळी अर्थमंत्री पेट्रोल-डिझेलवरील शुल्क कपात करून जनतेला दिलासा देतील ही अपेक्षा फोल ठरली. तर दुसऱ्या बाजूला अर्थमंत्र्यांनी देशी बनावटीच्या ब्रँडेड आणि नॉन ब्रँडेड मद्यावरील व्हॅटमध्ये ५ टक्क्यांची वाढ केल्याने दारू महागणार आहे.

सरकारने गेल्यावर्षी अर्थसंकल्पात पेट्रोल, डिझेलवरील मूल्यवर्धित करात (व्हॅट) प्रतिलिटर १ रुपयाने वाढ केली होती. त्यातच राज्यात पेट्रोलने शंभरी गाठल्याने केंद्र सरकारवर कुरघोडी करण्याच्या उद्देशाने का होईना, परंतु इंधनावरील शुल्कात राज्य सरकारकडून काहीतरी कपात करण्यात येईल, अशी अपेक्षा होती. परंतु या प्रकारची कुठलीही घोषणा करण्यात आली नाही. तरी देखील पुढील आर्थिक वर्षात सुमारे ६,६००० कोटींची महसुली तूट होईल, असा अंदाज अर्थमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

एका बाजूला पश्चिम बंगाल, राजस्थान, आसाम आणि मेघालय या ४ राज्यांनी इंधनावरील स्थानिक करात कपात केली असली, तरी महाराष्ट्रातील जनतेला मात्र अद्याप असा दिलासा मिळू शकलेला नाही.

हेही वाचा- Maharashtra Budget 2021: अर्थसंकल्पातून मुंबईला काय काय मिळालं? वाचा सविस्तर

तर दुसऱ्या बाजूला देशी बनावटीच्या ब्रँडेड आणि नॉन ब्रँडेड मद्यावरील व्हॅटमध्ये ६० टक्क्यांवरुन ६५ टक्के करण्यात आला आहे. तर सर्व प्रकारच्या व्हॅटचा दर ३० टक्क्यांवरुन ४० टक्के करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात आता दारू महागणार आहे.

देशी मद्याचे ब्रँडेड आणि नॉन ब्रँडेड असे दोन प्रकार निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार, देशी ब्रँडेड उत्पादन शुल्काचा दर निर्मिती मूल्याच्या २२० टक्के किंवा १८७ रुपये प्रति प्रूफ लिटर यापैकी जे अधिक असेल तो लागू करण्यात येईल. त्यातून राज्याला अंदाजे ८०० कोटी अतिरिक्त महसूल मिळणं अपेक्षित आहे. 

तसंच, मद्यावरील मूल्यवर्धित कर कायद्याच्या अनुसूची ख नुसार सध्याचा मूल्यवर्धित दर ६० टक्क्यांवरून ६५ टक्के, तर मूल्यवर्धित कर कायद्याच्या कलम ४१/५ नुसार मद्यावर सध्या असलेल्या मूल्यवर्धित कराचा दर ३५ वरून ४० टक्के वाढवण्याचं प्रस्तावित करण्यात आलं आहे. यामुळे राज्याला १ हजार कोटींचा अतिरिक्त महसूल मिळेल, असं अजित पवार यांनी सांगितलं.  

(VAT increase by 5 percent on alcoholic liquor in maharashtra budget 2021)

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा